PM Modi On Donald Trump Esakal
ग्लोबल

PM Modi On Trump: 'प्रिय मित्र...' ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोदी?

Assassination Attempt at Trump Rally : ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जगभरातील सर्व नेते त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

आशुतोष मसगौंडे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. डोनाल्ड ट्रम्प या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्यांना नंतर डिस्चार्ज देण्यात आला.

ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जगभरातील सर्व नेते त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. यासोबतच त्यांनी ट्रम्प यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये लिहिले की, "माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याने अत्यंत चिंतित आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. आम्ही अमेरिकन लोकांसोबत आहेत."

अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. दरम्यान, येथील प्रमुख नेते आपापल्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील एका निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला.

ही गोळीबाराची घटना पेनसिल्व्हेनियातील बटलरमध्ये घडली. या घटनेनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकन सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी तत्काळ स्टेजवरून बाहेर काढले.

या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर आला आहे. गोळी झाडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प व्यासपीठावर वाकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरले. व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या कानातून रक्तस्त्राव होतानाही दिसत आहे.

माजी राष्ट्रपती सुरक्षित असल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या आहेत, तपास सुरू आहे. बटलर काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नी रिचर्ड गोल्डिंगर यांनी सांगितले की, संशयित बंदुकधारी व्यक्तीला गोळी मारण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT