Mehul Choski's run away from Antigua 
ग्लोबल

पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सी एंटिग्वामधून बेपत्ता

सूरज यादव

हीरे व्यावसायिक मेहुल चोक्सीची कार रात्री उशिरा जॉली हार्बरमध्ये सापडली आहे. मात्र मेहुल चोक्सी त्यात नव्हता.

सेंट जॉन्स - पीएनबी बँक घोटाळा (PNB Scam) प्रकरणी फरार असलेला हिऱे व्यावसायिक मेहुल चोक्सी (Mehul Choksi) बेपत्ता झाला आहे. एंटिग्वा पोलिस त्याचा शोध घेत आहे. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली आहे. चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विजय अग्रवाल यांनी सांगितलं की, सोमवारी मेहुल चोक्सी घरातून एका रेस्टॉरॉंटमध्ये जाण्यासाठी गेला. मात्र त्यानंतर परत आलाच नाही. याबाबत स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, हीरे व्यावसायिक मेहुल चोक्सीची कार रात्री उशिरा जॉली हार्बरमध्ये सापडली आहे. मात्र मेहुल चोक्सी त्यात नव्हता. (PNB Scam Mehul choksi gone missing from antigua)

मेहुल चोक्सी बेपत्ता असून त्याचे कुटुंबिय चिंतेत आहेत. कुटुंबियांनी चर्चेसाठी मला बोलावलं आहे. एंटिग्वा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुटुंबाला चोक्सीबाबत काही माहिती नाही. त्याच्या सुरक्षेची काळजी वाटत असल्याचं वकील विजय अग्रवाल यांनी सांगितलं.

हिरे व्यावसायिक आणि गीतांजली समुहाचा मालक असलेल्या मेहुल चोक्सीला सीबीआय आणि ईडीने वाँटेड घोषित केलं आहे. मेहुल चोक्सीने घोटाळा उघडकीस येण्याआधी 4 जानेवारी 2018 ला देशातून पलायन केलं. त्याने एंटिग्वा जाण्याआधी 13 हजार 578 कोटींचा पीएनबी घोटाळ्यात तब्बल 7 हजार 80 कोटींचा फेरफार केला.

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात चोक्सीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. 2013 मधील शेअर बाजार घोटाळ्यातही त्याचे नाव होते. पीएनबीमध्ये घोटाळ्यानंतर तो देश सोडून पळाला होता. गेल्या वर्षी एक आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून ईडीने असा दावा केला होता की, चोक्सीने फक्त भारतीय बँकांनाच नाही तर दुबई आणि अमेरिकेतील ग्राहक आणि कर्जदारांची फसवणूक केली आहे. त्याची अडीच हजार कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT