Polio 
ग्लोबल

अमेरिकेत पोलिओचा रुग्ण आढळला

वीस वर्षाच्या तरुणांत लक्षणे; दहा वर्षांपूर्वीच्या पोलिओमुक्तीच्या घोषणेला धक्का

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क - न्यूयॉर्कच्या रॉकलँड काउंटीतील एका वीस वर्षीय तरुणाला पोलिओ झाल्याचे आरोग्य विभागाने गुरूवारी जाहीर केले. सुमारे दहा वर्षांतील हे पहिलेच प्रकरण आहे. त्याने पोलिओची लस घेतलेली नव्हती आणि तो जून महिन्यांत उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाला होता. अमेरिकेने दहा वर्षांपूर्वी पोलिओमुक्त झाल्याची घोषणा केली होती. परंतु कालच्या घटनेने या घोषणेला धक्का बसला आहे.

या तरुणाला जून महिन्यांत अर्धांगवायूचा झटका आला. त्याच्यात पोलिओची लक्षणे वाढली होती. विविध चाचण्या केल्यानंतर त्याला पोलिओ असल्याचे आरोग्य अधिकाऱ्याने जाहीर केले. अलीकडच्या काळात त्याने देशाबाहेर प्रवास केला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याच्यापासून संसर्गाचा धोका नाही. परंतु त्याला कोठे लागण झाली आणि अन्य लोकांना विषाणूंची लागण झाली आहे, याचा शोध घेतला जात आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, युवकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तो पत्नी आणि मुलांसमवेत राहत आहे. तो उभा राहू शकतो, परंतु चालताना अडचणी येत असल्याचे म्हटले आहे.

बहुतांश अमेरिकी नागरिकांचे पोलिओ लसीकरण झालेले आहे, परंतु ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांना धोका राहू शकतो, असे रॉकलँड काऊंटीच्या आरोग्य आयुक्त डॉ. पॅट्रिशिया शृब्रेल रुपर्ट यांनी सांगितले. पोलिओचा रुग्ण आढळल्याने रॉकलँड काउंटीत दोन दिवस लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. तेथील लोकांच्या आरोग्यासाठी न्यूयॉर्क स्टेट आरोग्य विभाग व साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र एकत्रितरीत्या काम करत आहे, असे त्या म्हणाल्या. अमेरिकेत अजूनही लसीकरण मोहीम राबविली जाते.

फेडरल अधिकाऱ्यांकडून चार डोसची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार दोन महिन्यांच्या आत, चार महिन्यांच्या आत, त्यानंतर ६ ते १८ महिन्यांत आणि नंतर ४ ते ६ वर्षादरम्यान पोलिओ डोस दिला जातो. काही राज्यांत तीन डोस दिले जातात. ‘सीडीसी’ ने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत दोन वर्षाच्या सुमारे ९३ टक्के मुलांना पोलिओचे किमान तीन डोस दिलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

चिमुकला पाण्यात बुडत होता; वाचवण्यासाठी दोघांची नदीत उडी अन्...; महादेव घाटावरील पिकनिकचा आनंद क्षणात शोकांतिकेत

Marathwada Farmers: ऐन हंगामात निसर्गाचा घाला! केळी, डाळिंब, मोसंबी बागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी

Bajaj Best Mileage Bikes : मार्केटमध्ये एक दमदार बाईक! 100 कि.मी. मायलेज अन् 91 हजार किंमत, पेट्रोलचं टेन्शन दूर

TasteAtlas च्या जगातील सर्वोत्तम कोळंबी पदार्थांच्या यादीत 'चिंग्री मलाई करी'; जाणून घ्या या प्रसिद्ध बंगाली पदार्थाचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT