Senegal Parliament esakal
ग्लोबल

VIDEO : संसदेत तुफान राडा; गर्भवती खासदाराच्या पोटात मारली लाथ, महिला झाली बेशुद्ध

याप्रकरणी दोन्ही खासदारांना शिक्षा जाहीर झाली असून आरोपी खासदारांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणी दोन्ही खासदारांना शिक्षा जाहीर झाली असून आरोपी खासदारांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे.

पश्चिम आफ्रिकेतील सेनेगलमधील (West Africa Senegal) संसदेत हिंसाचाराची घटना घडलीये. संसदेत चर्चेदरम्यान वाद विकोपाला गेल्यामुळं एका गर्भवती महिला खासदाराच्या पोटात लाथ मारण्यात आलीये.

याप्रकरणी आता दोन्ही खासदारांना शिक्षा जाहीर झाली असून दोन्ही आरोपी खासदारांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे. या हिंसाचारात गर्भवती महिला खासदार बेशुद्ध झाली होती. हिंसाचार झाला, तेव्हा संसदेत (Senegal Parliament) अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. या वादाचं रुपांतर हाणामारीत कधी झालं ते कोणालाच कळलं नाही.

दरम्यान, पोटावर लाथ मारणाऱ्या मामाडो नियांग आणि मसाता सांब या दोन खासदारांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला आहे. सेनेगलचे खासदार मामाडो नियांग आणि मसाता सांब यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. या दोघांनी खासदार एमी नादिये यांच्या पोटावर लाथ मारली. नियांग आणि साब यांना नादियाला 8,100 डॉलर देण्याचे आदेश दिले आहेत. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup Semi Final: फ्रान्स अन् एम्बाप्पेची मक्तेदारी संपुष्टात! स्पेनची बाचवभींत ओलांडण्यात अपयशी, 'Tiki-Taka' ने कमाल दाखवली

IND VS ENG 1ST ODI: हुशssss जिंकलो यार...! शुभमन गिलने खिंड लढवली, अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी; भारताची मालिकेत आघाडी

Pune Crime : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचे ‘पुणे कनेक्शन’; ‘एटीएस’कडून ६६ जणांची चौकशी, काही संशयित ताब्यात

Bidkin News : बिडकीनमधून दोन अल्पवयीन सख्खे भाऊ बेपत्ता; पोलिसांची रात्रभर शोधमोहीम, नागरिकांना आवाहन

Power Theft Drive: सावखेडा येथे महावितरणची वीजचोरीविरोधी धडक मोहीम; २४ आकडेबहादरांवर कारवाई, कठोर दंडात्मक गुन्हे दाखल होणार

SCROLL FOR NEXT