Gotabaya Rajapaksa Gotabaya Rajapaksa
ग्लोबल

राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे अजूनही श्रीलंकेतच; संसदेच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : श्रीलंकेत सरकारविरोधी निदर्शने सुरूच आहेत. आंदोलकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रोनिल विक्रमसिंघे यांच्या निवासस्थानांवर ताबा मिळवला आहे. देशात गोंधळ सुरू असताना राष्ट्रपती कुठे आहेत? याबाबत कोणतीही माहिती नाही. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) देशात असल्याचा दावा श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी सोमवारी (ता. ११) केला आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती श्रीलंकेतून निघून गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. राजीनामा जाहीर करणारे श्रीलंकेचे राष्ट्रपती पळून गेले असून, दुसऱ्या देशात असल्याचे सांगितले जात आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) अजूनही देशातच आहे. माझ्याकडून मुलाखतीत चूक झाली. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आणि राष्ट्राध्यक्ष दोघेही देशातच असल्याचे अभयवर्धने यांनी एएनआयला सांगितले.

श्रीलंकेला (Sri Lanka) अभूतपूर्व आर्थिक उलथापालथीचा सामना करावा लागत आहे. २२ दशलक्ष लोकसंख्या असलेला देश सात दशकांतील सर्वांत वाईट टप्प्यातून जात आहे. श्रीलंकेकडे परकीय चलनाची कमतरता आहे. ज्यामुळे देश इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंच्या आयातीसाठी पैसे देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत जनता रस्त्यावर उतरली आहे.

राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे १३ जुलै रोजी राजीनामा देतील, असे श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी शनिवारी सांगितले होते. शनिवारी सायंकाळी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर अभयवर्धने यांनी राजपक्षे यांच्या राजीनाम्यासाठी पत्र लिहिले होते. त्यानंतर अध्यक्ष राजपक्षे यांनी संसदेच्या अध्यक्षांना या निर्णयाची माहिती दिली. बैठकीत झालेल्या निर्णयांवर अभयवर्धने यांनी राजपक्षे यांना पत्र लिहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने घरात घुसून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले; डेव्हिड मिलरने ३ चेंडूंत फिरवली मॅच, गुणतालिकेत बदल

Hormuz Crisis: होर्मुजमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाचा मृत्यूशी संघर्ष! ICU मधील त्याची अवस्था पाहून क्रिकेट विश्वात हळहळ...

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

SCROLL FOR NEXT