Qatar Airlines Team eSakal
ग्लोबल

दिल्ली-दोहा विमानाचं कराचीत इमर्जन्सी लँडिंग

तांत्रिक बिघाड झाल्याने विमान उतरवल्याची प्राथमिक माहिती आहे.

सुधीर काकडे

कतार एअरवेजच्या दिल्लीहून दोहाकडे जाणाऱ्या QR579 या विमानाचं पाकिस्तानातील कराची विमानतळावर, आपातकालीन परिस्थितीत लॅंडींग करण्यात आलं. विमानातील कार्गो होल्ड भागात धूर असल्याचे सिग्नल मिळाल्याने विमान कराची विमानतळावर उतरवण्यात आलं. या विमानात १०० प्रवासी होते. त्यामुळे मोठा धोका टळल्याचं समजतंय.

कतार एअरवेजच्या या विमानाने आज पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी दिल्ली विमानतळावरून उड्डाण केलं होतं. दरम्यान सव्वा तासानंतर कार्गो होल्डमधून धूर निघत असल्याचं सिग्नल मिळाल्यानं विमानाचं कराचीकडे वळवण्यात आलं. सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी हे विमान कराची विमानतळावर लॅंड करण्यात आले.

दरम्यान, विमान कराचीत उतरल्यानंतर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचं समजतंय. त्यामुळे अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेबाबत कतार एअरवेजच्या वतीने निवेदन जारी करण्यात आलं आहे. एअरवेजकडून सांगण्यात आलं की, विमानाची तपासणी केली जात आहे, त्याचप्रमाणे प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दोहा येथे नेण्याची व्यवस्था केली जात आहे. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल एअरवेजने माफी मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Protest: दरवाजे उघडू ;राजू शेट्टी यांचा इशारा ;भिलवडी येथे कृष्णा नदीपात्रात सर्वपक्षीय आंदोलन

Loan Waive: शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मार्ग मोकळा साडेआठ हजार जणांची यादी जाहीर; आतापर्यंत ५२ हजार १८४ शेतकरी पात्र

'एक होती चिऊ एक होता काऊ...' डॉ. नेनेंसाठी हे सातारी शैलीत माधुरीचा हटके उखाणा, Video पाहून नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Update : खासगी फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत प्रशासनाची बैठक

Karjat Tree Felling: कर्जत तालुक्यातील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही;वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव यांची माहिती

SCROLL FOR NEXT