Queen Elizabeth Latest News Queen Elizabeth Latest News
ग्लोबल

Queen Elizabeth : राणीची प्रकृती बिघडली; डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिला ‘हा’ सल्ला

ब्रिटनमधून महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती ढासळल्याची बातमी आली आहे

सकाळ डिजिटल टीम

Queen Elizabeth Latest News ब्रिटनमधून महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth) यांची प्रकृती ढासळल्याची बातमी आली आहे. ‘डॉक्टर राणीच्या प्रकृतीबद्दल चिंतीत आहेत. तसेच त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे’ असे बकिंगहॅम पॅलेसने सांगितले आहे. ९६ वर्षीय राणी गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून आरोग्याच्या अनेक समस्यांमधून बऱ्या झाल्या आहे. परंतु, त्यांना चालणे आणि उभे राहण्यात अडचणी येत आहे.

विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर राणी वरिष्ठ राजकीय सल्लागारांसह पूर्वनियोजित बैठकीला उपस्थित राहिली नाही. यापूर्वी, त्यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार झालेल्या बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली. तसेच स्कॉटिश पर्वतरांगांमधील बालमोरल या राजवाड्यात नवीन पंतप्रधान लिझ ट्रस यांची नियुक्ती केली. प्रिन्स चार्ल्स आणि विल्यम सध्या बालमोरल, केसिंग्टन पॅलेसला भेट देत आहेत.

‘आज सकाळी आरोग्य तपासणीनंतर डॉक्टरांनी राणीला (Queen Elizabeth) वैद्यकीय निरीक्षणाखाली राहण्याचा सल्ला दिला आहे. राणी बालमोरल येथे आरामात आहे. राणीच्या प्रकृतीबाबत राजवाड्यातून माहिती मिळणे कठीण आहे’, असे बकिंगहॅम पॅलेसने एका निवेदनात म्हटले आहे.

काही वेळापूर्वी ब्रिटनचे (britain) नवे पंतप्रधान लिझ ट्रस आणि टीमला संसदेत ही माहिती देण्यात आली. त्यांना चेंबर सोडण्याची तयारी करण्यास सांगण्यात आले. ‘बकिंगहॅम पॅलेसमधील बातमीबद्दल देश चिंतेत आहे. ब्रिटनच्या लोकांची शुभेच्छा राणी आणि कुटुंबीयांसोबत आहे’ असे ट्विट यानंतर ट्रस यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT