CHina Internet Use Sakal
ग्लोबल

China Internet : चीनमध्ये लवकरच मुलांच्या इंटरनेट वापरावर निर्बंध; ‘सीएसी’चा प्रस्ताव

लहान मुलांमधील इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी चीन सरकारने आता कठोर पावले उचलायला सुरूवात केली आहे.

वृत्तसंस्था

बीजिंग - लहान मुलांमधील इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी चीन सरकारने आता कठोर पावले उचलायला सुरूवात केली आहे. नव्या नियमानुसार रात्री मुलांना स्मार्टफोन वापरण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला असून येत्या दोन सप्टेंबरपासून लोकांशी व्यापक चर्चा केल्यानंतर या नियमांची अंमलबजावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशातील अठरा वर्षांखालील मुलांचा रात्री दहा ते सकाळी सहा या काळातील इंटरनेट अॅक्सेस पूर्णपणे बंद करण्यात येईल.

मोबाईल इंटरनेट सेवेच्या वापरासाठी वेगवेगळे टप्पे केले जाणार असून त्याची काटेकोर अंमलबजावणीही करण्यात येईल. आठ वर्षांखालील मुलांना दिवसभरात केवळ चाळीस मिनिटेच मोबाईल इंटरनेटचा वापर करता येईल. सोळा ते सतरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी हाच वेळ दोन तासांचा असेल.

‘सायबर अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ चायना’ने (सीएसी) हे नवे प्रस्तावित नियम तयार केले असून ते जगातील सर्वाधिक कठोर नियम म्हणून ओळखले जातात. दरम्यान या नियमांचे पालन करण्याची कोणताही सक्ती केली जाणार नसून पालकांना जर बगल द्यायची इच्छा असेल तर ते याला टाळू देखील शकतात, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

नियमांमागचा उद्देश

इंटरनेटचा अधिक सकारात्मक पद्धतीने वापर व्हावा, सभोवताली चांगले वातावरण निर्माण व्हावे, मुलांमधील इंटरनेट आणि स्मार्टफोनचे व्यसन कमी व्हावे आणि मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात या उद्देशाने हे नियम तयार करण्यात आले आहेत.

लहान मुलांच्या ऑनलाइन ओळखीचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांना वयोमानानुसार योग्य कंटेंट कसा मिळेल? त्याचबरोबर त्यांच्यावरील वाईट माहितीचा प्रभाव कसा कमी होईल? हा देखील यामागचा प्रमुख उद्देश आहे.

टेक कंपन्यांवरही निर्बंध

नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचा लहान मुलांवरील प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नियम अधिक कठोर करायला सुरूवात केली आहे. यासाठी देशांतर्गत इंटरनेट कंपन्यांवर देखील वेगवेगळी बंधने घातली जात आहेत.

चीनने २०२१ मध्ये लहान मुलांच्या गेमिंगसाठीच्या वेळेला कात्री लावली होती. चीन सरकारच्या नव्या प्रस्तावित नियमांचे परिणाम आज शेअर बाजारामध्ये देखील दिसून आले यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर कोसळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT