Ukraine Foreign Minister 
ग्लोबल

जग पुतीन यांना थांबवू शकते, युक्रेनची मदतीसाठी हाक

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन स्वत:ला सुरक्षित ठेवेल आणि जिंकेलसुद्धा असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

ओटावा - रशिया युक्रेनवर हल्ल्याच्या तयारीत आहे. याबाबत रशियाने स्पेशल ऑपरेशनची घोषणासुद्धा केली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. अमेरिकेनं या दोन्ही देशांमध्ये कधीही युद्ध होऊ शकतं अशी शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी म्हटलं की, जगात दुसऱ्या महायुद्धानंतर हे सर्वात मोठं सुरक्षा संकट आहे. (Russia Ukraine Crisis News Updates)

युक्रेन स्वत:ला सुरक्षित ठेवेल आणि जिंकेलसुद्धा असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ठणकावून सांगितलं आहे. पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारलं आहे. युक्रेनमधील शांत शहर आता युद्धाच्या सावटाखाली आहे. हे खूपच आक्रमक असं युद्ध आहे. पुतीन यांना थांबवणं जगाला शक्य आहे आणि थांबवायलाच हवं. आता कृती करण्याची वेळ आली असल्याचंही ते म्हणाले.

जगाने आता तातडीने पावलं उचलायला हवी. रशियावर लवकरात लवकर निर्बंध लादायला हवेत. तसंच रशियाला सर्व बाजूनी घेरायला हवं, त्यांची नाकाबंदी करून एकटं पाडायला हवं. शस्त्रे इतर आवश्यक साधनांची युक्रेनला मदतीची गरज आहे. तसंच आर्थिक आणि मानवतावादी दृष्टीकोनातून मदतीचा हात हवा आहे. युरोपसह जगाचं भविष्य यामुळे धोक्यात आल्याचंही दिमित्रो कुलेबा यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugauli Treaty: भारताविरोधात मदतीची मागणी, पण ब्रिटनने हात झटकले; नेपाळचे पंतप्रधान बालेन शाहांची कोंडी

१४१३ कोटींची संपत्ती, पण ना मर्सिडीज ना ऑडी; डीके शिवकुमार यांच्या नावावर फक्त एकच जुनी कार!

'कृष्णाईच्या लेकी'मध्ये 'हा' अभिनेता साकारणार नायक; 'सहकुटुंब सहपरिवार'मधील अभिनेत्रीचीही एंट्री; पाहा संपूर्ण कास्ट

Latest Marathi News Update : नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Thane News: खोट्या कागदपत्रांच्या आधारे उभारली सात मजली इमारत, बिल्डरला अटक; रहिवाशांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT