Russia Ukraine War Russia Ukraine War
ग्लोबल

Ukraine Russia War: रशियाच्या हल्ल्यांचे क्षेत्र विस्तारले

रशियाने युक्रेनमधील आपल्या हल्ल्याचे क्षेत्र विस्तारत पश्‍चिम दिशेला सरकवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मारिउपोल : रशियाने युक्रेनमधील आपल्या हल्ल्याचे क्षेत्र विस्तारत पश्‍चिम दिशेला सरकवले आहे. युद्धाच्या आजच्या १६ व्या दिवशी रशियाच्या लढाऊ विमानांनी युक्रेनच्या पश्‍चिम भागातील काही विमानतळांवर हल्ले केले.

रशियाच्या हवाई दलाने लुत्स्क लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. रशियाने इव्हानो-फ्रॅकिस्क शहराजवळील विमानतळावरही हल्ले केले. हल्ल्यामुळे बेघर झालेल्या नागरिकांची राहण्याची सोय याच विमानतळावर केली जाणार होती. युक्रेनच्या पूर्व भागात असलेल्या डीनिप्रो या औद्योगिक शहरावर रशियाने आज प्रथमच थेट हल्ला केला. या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला.

राजधानी किव्ह शहरावर रशियाने पूर्व आणि वायव्य दिशेने जोरदार हल्ले सुरु केले आहे. हवाई हल्ले वाढले असले तरी शहराबाहेर तैनात असलेल्या सैनिकांच्या संख्येत घट झाल्याचे उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमधून दिसत आहे.

ठळक घडामोडी

  • रशियासमर्थक विदेशी लढाऊ स्वयंसेवकांना युक्रेनमध्ये आणावे : पुतीन यांचे आदेश

  • तुर्कस्तानच्या पेगॅसस एअरलाइन्सची आणि अमेरिकेतील गोल्डमन सॅक्सची रशियामधील सेवा स्थगित

  • रासायनिक अस्त्रांची प्रयोगशाळा असल्याचा रशियाचा आरोप युक्रेनला अमान्य

  • स्थलांतरांची संख्या २५ लाखांपर्यंत

  • युक्रेनी युवतीवर बलात्कार, पोलंडच्या पोलिस अधिकाऱ्याला अटक

  • बेलारूस सरकारवरही निर्बंध लागू करण्याची याच देशाच्या माजी नेत्यांची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT