serbia news 
ग्लोबल

Serbia gun fire: सर्बियातील शाळेत 14 वर्षांच्या मुलाकडून गोळीबार; 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू

या भीषण घटनेत इतर सहा मुलं आणि एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बलग्रेड : सर्बियातील एका शाळेमध्ये १४ वर्षीय मुलानं गोळीबार केला असून यामध्ये ८ विद्यार्थ्यांचा आणि सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सर्बियातील बेलग्रेडमध्ये हा भीषण प्रकार घडला आहे. सीएनएनच्या हवाल्यानं एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Serbia Eight children security guard killed after teenage boy opens fire at school)

या भीषण घटनेत इतर सहा मुलं आणि एक शिक्षक गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्बियाच्या अतंर्गत व्यवहार मंत्रालयानं ही माहिती दिली. मंत्रालयानं म्हटलं की, १४ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यानं आपल्या शाळेत हा गोळीबार केला. या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

व्लादिस्लाव रिब्निकर इलेमेंट्री स्कूलमध्ये सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी ही गोळीबाराची घटना घडली. सर्बियाची राजधानी बेलग्रेडमधील व्रॅकर भागात ही घटना घडली. या घटनेची माहिती कळताच गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या अल्पवयीन विद्यार्थ्यानं हा गोळीबार केला त्यानं आपल्या वडिलांचं पिस्तूल चोरुन नेलं आणि शाळेत गोळीबार केल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT