Bangladesh’s former Prime Minister Sheikh Hasina esakal
ग्लोबल

Sheikh Hasina sentenced : मोठी बातमी! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सहा महिने तुरुंगवास

Bangladesh Former PM Sheikh Hasina sentenced to six months jail - जाणून घ्या, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरणाने शेख हसीना यांना नेमकं कोणत्या प्रकरणात शिक्षा सुनावली आहे.

Mayur Ratnaparkhe

Bangladesh ex-PM Sheikh Hasina jail - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. न्यायालयाने त्यांना अवमान प्रकरणात दोषी ठरवले आहे. बांगलादेश मीडिया रिपोर्टनुसार त्यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरणाने शिक्षेचा निर्णय जाहीर केला आहे. बुधवारी तीन सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणी सुनावणी करताना हा निर्णय दिला. 

ढाका ट्रीब्यूनच्या वृत्तानुसार जस्टीस मोहम्मद गुलाम मुर्तजा मजूमदार यांनी शेख हसीना यांच्या प्रकरणाची सुनावणी केली. रिपोर्टनुसार मागील वर्षी शेख हसीना यांची एक ऑडियओ क्लप लीक झाली होती. शेख हसीना कथितरित्या लीक झालेल्या ऑडिओ क्लिमध्ये गोबिंदगंज उपजिल्हा अध्यक्ष शकील बुलबुल यांच्याशी बोलत होत्या, ज्यात त्यांनी म्हटले होते की, माझ्याविरोधात २२७ प्रकरणांची नोंद आहे, त्यामुळे मला या लोकांना मारण्याचा पवरवाना मिळाला आहे.

न्यायालयाच्या अवमान प्रकरणी शकील बुलबुल यांना दोन महिन्यांची शिक्षा झालेली आहे. बुलबुल ढाकामधील एक राजकीय प्रस्थ आहे आणि अवामी लीगच्या विद्यार्थी शाखा बांगालदेश विद्यार्थी लीगशी जुडलेले आहेत.

शेख हसीना यांना ऑगस्ट २०२४मध्ये पदावरून हटवलं गेलं होतं, ज्यानंतर स्टुडंट्स अगेंस्ट डिस्क्रिमिनेशनने(एसएडी) बांगलादेशात हिंसक निदर्शने केली होती. हे आंदोलन सरकारी नोकऱ्यांमध्ये कोटा सुधारण्याच्या मागण्यांवरून सुरू झाले होते. मात्र हे फार जास्त हिंसक झाले होते. संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टनुसार जुलै मध्यापासून ते ऑगस्ट मध्यापर्यंत जवळपास १४०० लोक मारले गेले होते.

एकीकडे बांगलादेशात हिंसक आंदोलन सुरू असताना, दुसरीकडे शेख हसीना भारतात निघून आल्या होत्या. तर त्यांचे अनेक माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी निदर्शनादरम्यान घेण्यात आलेल्या अ‍ॅक्शनमुळे कायदेशीर कारवाईचा सामना करत आहे. शेख हसीना भारतात निघून आल्याच्या तीन दिवसानंतर बांगलादेशात शेख युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन केले गेले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT