Shooting In Pakistan Schools 8 Teachers Killed In Shooting At School In Pakistan rak94 
ग्लोबल

Shooting In Pakistan Schools : पाकिस्तानातील शाळेत भीषण गोळीबार; 8 शिक्षक जागीच ठार

रोहित कणसे

Shooting In Pakistan Schools : पाकिस्तानमधील एका शाळेत हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात गोळीबारात 8 शिक्षकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना अप्पर करम आणि पाराचिनारमध्ये घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील पाराचिनार भागात काही सशस्त्र हल्लेखोरांनी शाळेवर हल्ला केला.

हल्लेखोरांनी सर्वप्रथम स्टाफ रूमला लक्ष्य केले. स्टाफ रूममध्ये प्रवेश करताच त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यामुळे तेथे उपस्थित शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबारानंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

ऑन-ड्युटी शिक्षकांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त करत पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. राष्ट्रपती अल्वी यांनी अप्पर करम आणि पारा चिनारमध्ये 8 शिक्षकांच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. ज्ञानाच्या शत्रूंनी शिक्षकांवर केलेला हा हल्ला निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संशयितांना लवकरच अटक करून कायद्यानुसार शिक्षा होईल, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीही 8 शिक्षकांच्या हत्येबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ड्युटीवर असताना शिक्षकांची हत्या ही दहशतवादाची घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच आसिफ अली झरदारी यांनीही शहीद झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती आणि संवेदना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT