Spice jet google
ग्लोबल

दिल्ली-दुबई विमानाचं कराचीत इमरजन्सी लँडिंग

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटचे SG-11 विमानाचे कराची (Karachi) येथे इमरजन्सी लँडिंग करण्यात आल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार विमानामध्ये तांत्रिक बिघाड (Technical Fault) झाल्यानंतर विमानाचे पाकिस्तानातील कराची येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. दरम्यान, विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. (Spice Jet Flight Emergency Landing In Karachi Pakistan)

लाईटमधील तांत्रिक बिघाडामुळे (Technical Fault) स्पाईसजेटचे विमान कराचीच्या दिशेने वळवण्यात आले असून, विमान कराचीत सुखरूप उतरवण्यात आले असून, यातील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे, अशी माहिती स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने दिली.

लँडिंग दरम्यान कोणतीही आणीबाणीची घोषणा न करता विमान सुरक्षितपणे काराची विमानतळावर उतरवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काराची विमानतळावर इमरजन्सी लँडिंग करण्यात आल्यानंतर प्रवाशांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली असून, दुसरे विमान लवकरच कराचीला पाठवण्यात येणार असून, या विमानाने सर्व प्रवाशांना दुबईला रवाना केले जाणार असल्याचे स्पाईस जेटच्या प्रवक्त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिग अलर्ट! या तारखेपासून सुरू होणार Flipkart Big Billion Days सेल; iPhone वर मोठ्या डिस्काउंटची शक्यता

Chief Sports Executive Officer : आदिती स्‍वामी बनली मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Kolhapur 10 Km Flyover : तावडे हॉटेल ते गगनबावडा रस्‍त्‍यावर 13 हेक्टर जमिनीचे होणार संपादन, 2000 कोटी खर्च होणार; केंद्र सरकारला 15 दिवसांत उड्डाणपुलाचा प्रस्ताव!

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

बापरे! पूनम धिल्लो अन् पद्मिनी कोल्हापुरेंविरोधात अभिनेत्रीची पोलीस तक्रार; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT