Taliban-Afghanistan 
ग्लोबल

तालिबान्यांचा आणखी तीन अफगाणी प्रांत राजधान्यांवर कब्जा

आठवडाभरात पाच राजधान्या ताब्यात

Amit Ujagare (अमित उजागरे)

काबूल : अफगाणिस्तानातील संघर्ष आता टिपेला पोहोचला आहे. गेल्या आठवडाभरात तालिबानने अफगाणिस्तानातील पाच प्रांतांच्या राजधान्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर बुधवारी आणखी तीन राजधान्यांवर तालिबान्यांनी कब्जा केला आहे. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपलं सैन्य मागं बोलावल्यानंतर अफगाणिस्तानच्या ३४ पैकी ९ प्रांतातील राजधान्या तालिबान्यांच्या हातात आल्या आहेत.

बाडखशन आणि बघलान हे ईशान्येतील प्रांत आणि पश्चिमेकडील फराह प्रांत तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहेत. याद्वारे त्यांच्याकडून देशाच्या केंद्र सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूल शहराला तालिबान्यांनी थेटपणे धमकावलेलं नसलं तरी तालिबानच्या हल्ल्यामुळे अफगाण सुरक्षा दलांचा ताण वाढला आहे आणि आता ते बऱ्याच प्रमाणात बंडखोरांविरुद्ध स्वतःहून लढत आहेत.

गेल्या पाच दिवसांत तालिबानने पाच प्रांताच्या राजधानींवर ताबा मिळवला आहे. उत्तरेत कुंडुज, सर ए पोल आणि तालोकानवर तालिबानने वर्चस्व मिळवले आहे. दक्षिणेत इराण सीमेशी लगत निमरोज प्रांताची राजधानी जरांजवर तालिबानने ताबा मिळवला. उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान सीमेलगत असलेल्या नोवज्जान प्रांताची राजधानी शबरघान येथे भीषण युद्धानंतर तालिबानच्या दहशतवाद्यांनी वर्चस्व मिळवले. त्यामुळे अफगाणिस्तानच्या ८० टक्के भागांवर तालिबानने ताबा मिळवला आहे.

पारंपरिकरीत्या तालिबानचा गड असलेल्या कुडुंज शहरावर तालिबानचा झेंडा हा आतापर्यंतचा दहशतवाद्यांचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. अफगाणिस्तानला मध्य आशियाला जोडणारा रस्ता याच शहरातून गेला आहे. या मार्गावरून अमली पदार्थाची तस्करीही मोठ्या प्रमाणात होते. युरोपला याच शहरातून अमली पदार्थ जातात. त्यामुळे या शहरावर ताबा मिळवल्याने तालिबानकडे मोठा आर्थिक स्रोत आला आहे. तालिबानने यापूर्वीही २०१५ आणि २०१६ रोजी काही काळासाठी कुडुंज शहरावर ताबा मिळवला होता. आता कुडुंज शहरातून तालिबानच्या दहशतवाद्यांना हुसकावून लावणे हे अफगाणिस्तानच्या सैनिकांसमोर मोठे आव्हान असेल. दीर्घकाळापर्यंत कुडुंजवर तालिबान्यांचे वर्चस्व राहिले तर त्यांच्यासाठी नवीन स्रोत तयार होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT