Violence case Mahinda Rajapaksa interrogated for three hours sri lanka sakal
ग्लोबल

हिंसाचारप्रकरण : महिंदा राजपक्ष यांची तीन तास चौकशी

हिंसाचारात दहा नागरिक ठार झाले आणि २०० हून अधिक जखमी

सकाळ वृत्तसेवा

कोलंबो : आर्थिक अडचणीत असलेल्या श्रीलंकेत ९ मे रोजी उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी श्रीलंकन पोलिसांनी माजी पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांची तीन तास इन कॅमेरा चौकशी केली आणि जबाब नोंदवून घेतला. या हिंसाचारात दहा नागरिक ठार झाले आणि २०० हून अधिक जखमी झाले होते. नऊ मे रोजी महिंदा राजपक्ष यांच्या समर्थकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर हल्ले केले. यानंतर नागरिकांनी प्रतिहल्ले सुरू केले आणि त्यात सरकारी मालमत्तेची नासधूस करण्यात आली.

ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारात दोनशेहून अधिक जखमी झाले होते. याच दिवशी पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान असलेल्या कोलूपिटिया आणि गॅले फेस ग्रीन येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी काल गुन्हे तपास खाते (सीआयडी) ने महिंदा राजपक्ष यांचा जबाब नोंदवून घेतला.

आज मुलाचीही चौकशी

श्रीलंका सुरक्षा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस खात्याचे प्रमुख यांनी काल राजीनामा दिला आहे. गेल्या आठवड्यात श्रीलंकेच्या सीआयडी पथकाने सत्ताधारी एसएलपीपी संसदीय गटाच्या तीन सदस्यांची चौकशी केली होते. हे सदस्य हिंसाचारात सहभागी असल्याचा ठपका आहे. यापैकी दोघांना अटक करण्यात आली आली होती. उद्या (ता.२७) माजी मंत्री आणि महिंदा राजपक्ष यांचे चिरंजीव नमाल राजपक्ष यांचीही चौकशी केली जाणार असून त्यांना तशी नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

SCROLL FOR NEXT