Corona टिम ई सकाळ
ग्लोबल

कोरोनाच्या NeoCov या नव्या व्हेरिअंटवर WHO काय म्हणाले?

NeoCov या नव्या कोरोना व्हायरसच्या सखोल अभ्यासाची आवश्यकता - जागतिक आरोग्य संघटना

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाच्या नव्या नव्या व्हेरिअंटमुळे सर्वांची चिंता वाढत आहे. अशातच आता आणखी एक नवा वेरियंट समोर आला आहे.चिनी शास्त्रज्ञांनी शोधलेल्या नियोकोव (NeoCov) हा नवीन कोरोनाव्हायरस कोरोनापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी या नियोकोव (NeoCov) कोरोना व्हायरससाठी महत्त्वाच्या अभ्यासाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

वुहान संशोधकांच्या टीमला दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये एक नवीन प्रकारचा कोरोनाव्हायरस, नियोकोव (NeoCov) आढळला. सध्या हा फक्त जनावरांमध्ये फैलावत आहे परंतू या व्हायरसमुळे भविष्यात मानवांसाठी धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. नियोकोव (NeoCov) व्हायरसचे संक्रमण झालेल्या 3 पैकी 1 व्यक्तीचा मृत्यू होत आहे तसेच हा झपाट्याने पसरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाव्हायरस हे विषाणूंचे एक मोठे जाळे आहे ज्यामुळे सामान्य सर्दीपासून गंभीर श्वसन सिंड्रोम (SARS) पर्यंतचे रोग होऊ शकतात परंतु या विषाणूमुळे मानवांना धोका आहे की नाही, हे शोधण्यासाठी आणखी अभ्यास करणे आवश्यक असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. सोबत डब्ल्यूएचओने नियोकोव (NeoCov) व्हायरसचे संशोधन प्रीप्रिंटमध्ये सामायिक केल्याबद्दल चिनी संशोधकांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT