Thomas Mathew Crooks Shoot At Donald Trump Esakal
ग्लोबल

Donald Trump: ट्रम्प यांच्यावर गोळीबार कोणी केला? हल्लेखोराची ए टू झेड माहिती एका क्लिकवर

Thomas Mathew Crooks: गोळीबार करणाऱ्याने ट्रम्प यांच्यावर अतिशय उंच जागेवरून गोळीबार केला. समोर आलेल्या घटनेच्या व्हिडीओमध्ये ट्रम्प यांच्या कानातून रक्त बाहेर पडताना दिसत आहे.

आशुतोष मसगौंडे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हल्लेखोराने उंचीवरून त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र, ट्रम्प यांच्या कानाला दुखापत झाली. सध्या ते धोक्याबाहेर आहेत.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) हल्लेखोराच्या ओळखीबाबत मोठा खुलासा केला आहे. एजन्सीने सांगितले की, हल्लेखोरचे नाव थॉमस मॅथ्यू असून तो 20 वर्षांचा होता. ट्रम्प यांच्यावरील गोळीबारानंतर लगेचच स्नायपरने त्याला ठार केले.

थॉमस मॅथ्यू कोण होता?

यूएस मीडिया रिपोर्ट्सनुसार, थॉमस मॅथ्यूने ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्यासाठी रॅलीच्या ठिकाणापासून जवळ असलेला एक प्रोडक्शन प्लांट निवडला होता. ट्रम्प यांच्या रॅलीच्या ठिकाणापासून तो फक्त काही अंतर होता असे वृत्त अमेरिकन मीडियाने दिले आहे. त्याने गोळीबार सुरू केल्यानंतर काही वेळातच त्याला सीक्रेट सर्व्हिस स्निपरने गोळी घातली. नंतर तपासादरम्यान हल्ल्याच्या ठिकाणाहून एक एआर स्टाईल रायफलही जप्त करण्यात आली.

राष्ट्रीय पुरस्कार

अमेरिकन माध्यमांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प यांच्या शूटरचे नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स असून, त्याने 2022 मध्ये बेथेल पार्क हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे. क्रुक्सला शैक्षणिक कामगिरीसाठी राष्ट्रीय गणित आणि विज्ञान पुढाकार स्टार पुरस्कार मिळाला होता.

एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय तरुण ट्रम्प यांच्या रॅलीच्या ठिकाणापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेथेल पार्क नावाच्या ठिकाणी राहत होता. मात्र, त्याने ट्रम्प यांच्यावर हल्ला का केला, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा एकजन जखमी झाला आहे. या दोघांचाही हल्लेखोराशी संबंध असल्याचे बोललो जात असून, याबाबत चौकशी सुरू आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाकडून आगामी निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी एका रॅलीदरम्यान हल्ला झाला होता.

गोळीबार करणाऱ्याने ट्रम्प यांच्यावर अतिशय उंच जागेवरून गोळीबार केला. समोर आलेल्या घटनेच्या व्हिडीओमध्ये ट्रम्प यांच्या कानातून रक्त बाहेर पडताना दिसत आहे.

या घटनेनंतर ट्रम्प धोक्याबाहेर आहेत. त्यांनी स्वत: त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एक निवेदन जारी करून आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

Latest Marathi News Live Update : दिल्लीत हाय अलर्ट! सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द, अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश

Dharmendra Pradhan salary : केंद्रीय कॅबिनेट शिक्षण मंत्र्यांवर सरकारचा दरमहा किती खर्च? धर्मेंद्र प्रधान यांच्या उदाहरणातून समजून घ्या

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT