Swim Topless 
ग्लोबल

Swim Topless : आता 'या' सार्वजनिक स्विमींगपूलमध्ये महिलांना टॉपलेस पोहण्यास परवानगी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - स्विमिंग पूलमध्ये आंघोळीचा आनंद तुम्ही घेतलाच असेल. आंघोळीचे तसेच करमणुकीचे हे उत्तम साधन आहे. आजकाल लोक मोठमोठ्या हॉटेल्स आणि सोसायट्यांमध्ये स्विमिंग अनिवार्य झाला आहे. जलतरण तलावासह सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी घर खरेदी करण्यास लोक प्राधान्य देतात.

सर्वसाधारणपणे स्विमिंग पूलमध्ये स्त्री-पुरुष दोघांनाही एकत्र आंघोळ करण्याची परवानगी असली तरी कपड्यांशिवाय कोणालाही आंघोळ करण्याची परवानगी नाही, पण जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये आता असेच काहीसे पाहायला मिळेल, कारण येथे महिलांना स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस आंघोळ करण्याची परवानगी देण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, बर्लिनमधील महिलांना शहरातील सार्वजनिक जलतरण तलावांमध्ये टॉपलेस जाण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने गुरुवारी केली. स्विमिंग पूलमध्ये महिला आणि पुरुषयांच्यात भेदभाव झाल्याची तक्रार एका महिलेने केली होती, त्यानंतर बर्लिन सरकारने हा अत्यंत विचित्र निर्णय घेतला होता.

बर्लिन सिनेट फॉर जस्टिस, डायव्हर्सिटी अँड अँटी डिस्क्रिमिनेशनने म्हटले की, महिलेने सिनेटच्या लोकपाल कार्यालयात समान वागणुकीची मागणी करत महिलांना पुरुषांप्रमाणे टॉपलेस पोहण्याची परवानगी दिली पाहिजे, असं म्हटलं. त्यानंतर शहरातील सार्वजनिक पूल चालविणारे बर्लिनर बॅडरबाटिबे यांनी कपड्यांच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सिनेटने म्हटले आहे.

लोकपालचे प्रमुख डॉरिस लेब्शर म्हणाले, "लोकपाल कार्यालय बॅडरबाटिबे यांच्या निर्णयाचे स्वागत करते, कारण यामुळे सर्व बर्लिनवासीयांना समान अधिकार आहेत, मग ते पुरुष असोत किंवा महिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil on Hasan Mushrif : मानाच्या गणपती पूजनानंतर सतेज पाटलांनी हसन मुश्रीफांना केलं टार्गेट; "गोकुळच्या निवडणुकीत पराभव दिसू लागला"

Sugarcane Agitation : माजी खासदार राजू शेट्टी माजी सहकार मंत्र्यांच्या भेटीला ऊस आंदोलनात सहकार्य करण्याची केली विनंती

Water Shortage: अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारी प्रशासनाकडून जप्त

Maharashtra Ganesh Visarjan Live: अलका चौकात गणरायाच्या स्वागतासाठी साकारली भलीमोठी आकर्षक रांगोळी, गणपती मिरवणुकीच्या उत्साहात रंगले पुणे

New Blood Group: वैज्ञानिकांनी शोधला अतिदुर्मिळ 'JAMA' ब्लड ग्रुप! जाणून घ्या रुग्णांना काय होणार फायदा...

SCROLL FOR NEXT