Goa Election  Sakal
Goa Assembly Election

Goa Election: प्रचार थंडावला; पर्रीकर, सावंत यांचे भवितव्य पणाला

गोव्यात प्रथमच बहुरंगी लढती असल्याने रंगत निर्माण झाली आहे.

धनंजय बिजले

पणजी : सत्तारुढ भाजप व काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत सुरु असली तरी गोव्याच्या स्वभावानुसार येथील शांत, सुशेगाद प्रचार आज थंडावला. आता सोमवारी (ता. १४) सुमारे साडेअकरा लाख मतदार ३०१ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. (Goa Assembly Election Updates )

गोव्यात प्रथमच बहुरंगी लढती असल्याने रंगत निर्माण झाली आहे. येथील मतदारसंघात २२ ते ३० हजारच मते असल्याने लढती चुरशीने होतात. काहीशे मतेही निकाल फिरवतात. भाजप किंवा काँग्रेसला बहुमत मिळणार का?, आप व तृणमूलच्या उमेदवारांना किती मते, जागा मिळणार? याबाबत मतदारांच्या मनात भारी कुतूहल असल्याचे विविध भागांत त्यांच्याशी बोलताना जाणवले. गोवेकरांचे या ५ मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे.

पणजीकडे देशाचे लक्ष

पणजीत दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल यांनी बंडखोरी केल्याने देशाचे लक्ष येथील लढतीकडे लागले आहे. भाजपचे उमेदवार बाबुश मोन्सेरात आणि अपक्ष उत्पल पर्रीकर यांच्यातच लढत आहे. गेल्यावेळी मोन्सेरात १७५८ मतांनी विजयी झाले होते. दोनदा आयुक्त राहिलेले सनदी अधिकारी एल्विस गोम्स काँग्रेसचे उमेदवार आहेत. आपचे वाल्मीकी नाईक व उत्पल यांना किती मते मिळतील यावर त्यांची भिस्त आहे.

तृणमूल, आप खाते उघडणार?

बाणावली मतदारसंघात प्रामुख्याने तृणमुल कॉंग्रेसचे चर्चिल आलेमाव, आपचे वेन्झी वियेगस तसेच काँग्रेसचे अँथनी डायस यांच्यात तिरंगी लढत आहे. चर्चिल आलेमाव यांचा हा परंपरागत मतदारसंघ आहे. येथे कदाचित आप, तसेच तृणमूलला विजयाची मोठी आशा आहे.

मडगावमध्येही चुरस

मडगावमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याविरुद्ध भाजपकडून उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी दंड थोपटले. कामत यांचा येथे मोठा प्रभाव आहे. काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला नसला तरी सत्ता मिळाल्यास कामतच मुख्यमंत्री होतील असे सध्याचे चित्र आहे.

राणेंच्या घरातील लढाई

चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले ८३ वर्षीय प्रतापसिंह राणे पोरियम मतदारसंघातून काँग्रेसकडून सलग ११ वेळा विजयी झाले. यंदाही ते उभे होते. पण त्यांच्या स्नुषा दिव्या राणे याच येथून भाजपकडून उभ्या राहिल्या. त्यामुळे प्रतापसिंह राणे यांना माघार घ्यावी लागली. काँग्रेसने येथे रणजीत राणे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचा हा गड यंदा भाजपकडे जाणार का याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे.

मुख्यमंत्री हॅटट्रिक करणार का?

साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत तिसऱ्यांदा लढत आहेत. पर्रीकर यांच्या निधनानंतर अचानक सावंत मुख्यमंत्री झाले. खाणीचे साम्राज्य असलेल्या या भागात सध्या खाणी बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. कॉंग्रेसचे धर्मेश सगलानी यांनी याच मुद्यावर रान पेटवत सावंत यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT