Rahul Gandhi CEO Sakal
Goa Assembly Election

राहुल गांधींचा गोवा दौरा लांबणीवर

२ फेब्रुवारीला राहुल गांधींची होणारी गोवा भेट पुढे ढकलण्यात आली आहे.

दत्ता लवांडे

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांची २ फेब्रुवारीला होणारी गोवा भेट पुढे ढकलली असून ४ फेब्रुवारीला होणार असल्याचं पार्टीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलंय. (Goa Assembly Election Updates)

गोवा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सगळ्या पक्षांनी मोर्चेबांधणी केली असून कॉंग्रेसचे नेते राहून गांधी यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी गोव्यात प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. परंतु ही भेट आता ४ फेब्रुवारीला होणार असल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान निवडणुक आयोगाने गोव्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्यानंतरची राहुल गांधी यांची ही पहिलीच गोवा भेट असणार आहे. गोव्यात कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांची युती असून कॉंग्रेसच्या ३७ उमेदवारांना राहूल गांधी भेटणार आहेत. गोव्यात विधानसभेच्या एकूण ४० जागांसाठी ५८७ उमेदवार रिंगणात उतरले असून १४ फेब्रुवारीला मतदान होणार असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत होती ती आता संपलेली आहे.

गोव्यातील विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : दिल्ली पोलिसांकडून 'एक्सपायर्ड' अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ५३ कोटींचा खर्च; क्रीडा मंत्रालयाकडून ॲथलेटिक्स, बॉक्सिंगला प्राधान्य

'देशविरोधी शक्तींनी आंदोलन हायजॅक करू नये' दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर प्रीती झिंटा म्हणाली...'आंदोलनाचा गैरफायदा घेऊ नका'

Live Updates Marathi : नागपूरमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Amravati News: शासकीय योजनेतील विहीर गेली चोरीला; गावकऱ्यांची पोलिस ठाण्यात धाव

SCROLL FOR NEXT