health-fitness-wellness

विशीनंतर आहारात 'हे' 5 पदार्थ हवेतच!

स्नेहल कदम

यासाठी महिलांना काही महत्वाच्या फळांचा डायटमध्ये समावेश करण्याचा तज्ज्ञ सल्ला देतात.

घरी एखादी वस्तू कुठे ठेवली आहे, त्यापासून एखादी वस्तू कुठे ठेवावी. आज जेवणासाठी काय बनवावे इथपर्यंत सर्व जबाबदाऱ्या महिला स्विकारतात. घरातील, ऑफीसमधील, व्यवसाय आणि इतरही बरीच कामे सांभाळून महिला या सर्व जबाबदाऱ्या लिलया पेलतात. यामुळे त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे, शरिराकडे दुर्लक्ष होते. परंतु अशा सर्व महिलांसाठी तज्ज्ञ एक महत्वाचा सल्ला देतात. तो म्हणजे वयाच्या २० व्या वर्षांनंतर तुम्ही आरोग्याची आणि शरीराचा काळजी घेणे आवश्यकच असते. कारण या वयानंतर शरीरात अनेक मेंटली, फिजीकली बदल होत असतात. यासाठी महिलांना काही महत्वाच्या फळांचा डायटमध्ये समावेश करण्याचा तज्ज्ञ सल्ला देतात.

दूध -

अनेक आरोग्य तज्ज्ञ महिलांना नियमितपणे दूधाचे सेवन करण्याचा म्हणजे दूध पिण्याचा सल्ला देतात. कारण कामाच्या तणावामुळे बऱ्याचवेळा त्यांची हाडे कमकुवत होण्याचा धोका असतो. दूधामध्ये अनेक पोषकतत्वे, प्रोटिन, व्हिटामीन, कॅल्शिअम असते. जे शरीरासाठी उपयुक्त असते. त्यामुळे महिलांना आहारात दूध पिणे बंधनकारक करावे.

milk

संत्री ज्युस -

वयाच्या २० वर्षानंतर मासिकपाळीमुळे शरीरातील होर्मोन्समध्ये बदल होतात. या बदलांसोबत शरीरात अनेक बदल होतात. यामुळे महिलांना शारीरीक आणि मानसिक बदलालाही समोरे जावे लागते. यासाठी संत्रीच्या ज्युसचे सेवन करणे उत्तम आहे. यामध्ये 'व्हिटॅमीन सी'चे प्रमाण असते. ते शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी हे उपयोगी पडते. शिवाय त्वचेच्या इम्युन सिस्टीमला मजबूत ठेवण्याचे कामही करते.

Orange

टोमॅटो -

मुख्यत्वेकरुन महिलांनी आहारात टोमॅटोचा सर्रास वापर करावा असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. कारण यामध्ये लाइकोपिन नावाचे तत्व असते. ब्रेस्ट कॅंसरपासून सुरक्षित राहायचे असल्यास काही प्रमाणात टोमॅटोचा वापर होतो. त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठीही टोमॅटोचा उपयोग केला जातो.

Tomato

सोयाबीन -

महिलांनी सोयाबिनचे नियमित सेवन करावे असा सल्ला तज्ज्ञ देतात. यामध्ये प्रोटिन, लोह, व्हिटॅमीनचे प्रमाण असते. महिलांच्या शरीरात लोहाचे प्रमाण अधिक असणे आवश्यक असते. कारण त्यांच्या शरिरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास अॅनिमियाचा धोका उद्भवू शकतो.

soya-bean-chunk

ड्रायफ्रुट्स -

महिलांचे आरोग्य उत्तम ठेवयाचे असल्यास त्यांनी वेळोवेळी ड्रायफ्रुट्स खाणे गरजेचे आहे. ज्यामध्ये प्रोटिन, फायबर, लोहाचे प्रमाण असते. सोबतच महिलांना बदाम, आक्रोड, किशमिश, अंजीरही खाल्ले पाहिजे. त्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो.

Dry-Fruit

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT