after corona gums problem
after corona gums problem after corona gums problem
health-fitness-wellness

किडलेले दात वाचवायचे आहेत, हे आहेत तीन मार्ग

सकाळ डिजिटल टीम

दातांचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरिराराच्या आरोग्यावर परिणाम करु शकते. त्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश करणे गरजेचे आहे. पण सहसा या गोष्टींचे पालन केल नाही. जेव्हा दातांना वेदना होत असतील किंवा त्या नियंत्रणाबाहेर जात असतील, तेव्हाच आपण डॉक्टरांकडे जातो. पण त्याऐवजी आपण नियमितपणे डॉक्टरांना भेटलो तर आपण आपल्या दातांविषयी जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो.

दातांत कीड होणे ही एक सामान्य समस्या आहे, जी मुले आणि प्रौढ दोघांमध्ये दिसून येते. सण-उत्सवाच्या काळात मिठाईचा आस्वाद घेताना जेव्हा आपला उत्साह असतो, तेवढाच उत्साह त्यानंतर आपले दात स्वच्छ करण्यासाठी दाखवायला हवा.

प्रसिद्ध प्रोस्थोडोन्टिस्ट, इम्प्लांटोलॉजिस्ट आणि स्माईल डिझाईन तज्ञ डॉ. दिक्षा बत्रा, दातांना पोकळीपासून वाचवण्याचे तीन सोपे मार्ग सांगतात;डॉ. बत्रा म्हणतात, आपण रोज सकाळी दिवसाचे नियोजन करत काही सेंकंद ब्रश केला तरी आपण दिवसभर जे काही खातो, त्यापासून आपल्या दातांचे संरक्षण होऊ शकते. उदाः मिठाई, धूम्रपान इ. हे खरं आहे की, आपल्या तोंडाला कमी देखभालीची गरज असते. परंतु आपण त्याची काळजी घेतल्यास आपल्याला दात घासणे अधिक फायदेशीर ठरू शकतो.

Dental Hygienist Career opportunity Know about education and salary in it

1) नियमित दात घालणे

- दंतवैद्यांनी शिफारस केलेली टूथपेस्ट वापरून आपण हिरड्यांचे चांगल्या प्रकारे संरक्षण करु शकते. यासाठी वॉटर फ्लॉसर तुम्हाला दात स्वच्छ करण्यास मदत करू शकतात, टंग क्लिनरने जीभ स्वच्छ केल्याने तोंडात जीवाणूंची संख्या नियंत्रित राहू शकते.

2) दातांची काळजी घेण्याकरता असणाऱ्या उत्पादनांमध्ये फ्लोराईड असणे-

फ्लोराइडच्या वापराबद्दल समाजात अनेक चुकीचे समज आहेत. परंतु, योग्य प्रमाणात फ्लोराइडचा वापर केल्यास तो दातांच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचा घटक ठरतो. तुमच्या माऊथवॉश आणि टूथपेस्टमध्ये जर योग्य प्रमाणात फ्लोराईड असेल तर तुमच्या दातांचे बॅक्टेरियापासून संरक्षण होऊ शकते, असे डॉ. बत्रा म्हणतात.

3) डिमिनेरलायझेशनचा उपचार-

दातांमध्ये पोकळी निर्माण होणे म्हणजे डिमिनेरलायझेशन. दातांच्या समस्यांनी त्रस्त अनेकांना याचा फायदा होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT