online yoga 
health-fitness-wellness

लॉकडाउनमधील ऑनलाइन योगसाधना- भाग २

या दुसऱ्या भागात गर्भवती स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक आपलं आरोग्य कशाप्रकारे राखू शकतात, ते पाहुयात..

देवयानी एम. योग प्रशिक्षक

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन योग वर्ग हे कशाप्रकारे वरदान ठरलेलं आहे, हे आपण भाग १ मध्ये जाणून घेतलं. या दुसऱ्या भागात गर्भवती स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक आपलं आरोग्य कशाप्रकारे राखू शकतात, ते पाहुयात..

गर्भवती स्त्रिया-

आता चालण्याला मर्यादा आली असल्याने गर्भवती स्त्रियांच्या व्यायामाकडे जास्त स्मार्ट पद्धतीने बघण्याची गरज आहे. त्यांचे पोश्चर, पाठदुखी, थकवा, स्टॅमिना, मानसिक ताण, मूड, झोप, प्रेग्नंसीमध्ये वाढलेले वजन, लेबरमध्ये होणारा त्रास, डिलिव्हरी नंतरची रिकव्हरी, गरोदरपणातील मधुमेह, स्ट्रेस, डिप्रेशन, अँग्झायटी, रक्तदाब, बद्धकोष्ठता, आईबरोबरच बाळाचे आरोग्य या सर्वांसाठी उत्तम उपाय म्हणजे गरोदरपणातील पूरक अशी योगासने आणि प्राणायाम.

ज्येष्ठ नागरिक-

सध्या सर्वांत जास्त धास्ती आणि काळजी कोणाची असेल तर ज्येष्ठ नागरिकांची. त्यांचे आरोग्य, चलनवलन, मनोधैर्य, त्यांच्या कलाने सांभाळून व्यायाम घेणे गरजेचे आहे. यासाठी ऑनलाईन योग वर्ग हे त्यांच्यासाठी मानसिक व शारीरिक आधारस्तंभ ठरतील.

मानसिक आरोग्य-

योगामुळे तुमच्या आत असलेली उदंड क्षमतेची प्रचिती तुम्हाला येईल. करण्यासारखं खूप काही आहे, मार्ग शोधला तर उत्तरं नक्कीच सापडतील. त्यामुळे खचून जाऊ नका, सगळे ठीक होण्याची वाट पाहू नका, आहात तिथून ध्येयापर्यंत पोहोचता येणे तंत्रज्ञानाने शक्य केले आहे. हे तंत्रज्ञान दुर्दैवाने समाजातील सर्व स्तरांतील लोकांना उपलब्ध होऊ शकत नाही, त्यामुळे ज्यांना ही सुविधा सहज उपलब्ध आहे, त्यांनी याचा योग्य उपयोग करून घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

Coastal Road: वेगमर्यादा, प्रवेशबंदी आणि प्रवेश मार्ग; कोस्टल रोड, सी लिंकवरील वाहतुकीसाठी नवे नियम जारी

Marathi News Live Updates : गांजा खरेदी करण्यासाठी पैशाचा पुरवठा करणाऱ्या कोल्हापुरातील दोन महिलांना पोलिसांनी केली अटक

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

SCROLL FOR NEXT