health-fitness-wellness

लॉकडाउनमधील ऑनलाइन योगसाधना- भाग १

भूक-झोप, त्यांच्या वेळा यांचे नियमन योगाच्या साहाय्याने शक्य आहे.

देवयानी एम. योग प्रशिक्षक

प्रत्येक व्यक्तीसाठी तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आनंद, अर्थपूर्णता आणि आव्हान. कोणतेही काम करताना हे तीन पैलू साध्य होत असतील तर प्रगती निश्चित आहे. पण याचसोबत अनुशासित आयुष्य किंवा शिस्तबद्धता (self descipline) हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बाहेर कशीही परिस्थिती असली तरी आपल्या दिनचर्येची शिस्तबद्धता टिकवून केलेले काम हे आनंद आणि अर्थपूर्णता देणारं ठरेल. लॉकडाउनमुळे बाहेरची हालचाल आणि एकंदर स्वातंत्र्य जरी सीमित असलं तरी तंत्रज्ञानामुळे आपल्या दिवसातील व्यायामाची वेळ राखीव ठेवून दिवसाचे नियोजन करणे शक्य होते. ऑनलाइन योग वर्ग हे या काळात ठरलेलं वरदान आहे. याची पावती म्हणजे माझ्याकडे योग शिकायला येणाऱ्यांचे समाधानी चेहरे आणि मेसेजेस, ज्याने माझं बळ कित्येक पटीने रोज वाढतं.

जनरल फिटनेस –

आधी नियमित व्यायाम करत असाल तर तो आता थांबवण्याचं काहीच कारण नाही. घरूनदेखील तेच बलोपासनेचं रुटीन चालू ठेवू शकता. व्यायाम न करणाऱ्यांना मी सांगेन “हीच ती वेळ”. पचनसंस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्था, रक्ताभिसरण संस्था, अंतःस्त्रावी प्रणाली, प्रजनन संस्था, स्नायूंची लवचिकता, पोश्चर, स्टॅमिना हे सर्व या निर्बंधाच्या काळातही उत्तम प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी नियमित योगासने व प्राणायाम गरजेचा आहे. भूक-झोप, त्यांच्या वेळा यांचे नियमन योगाच्या साहाय्याने शक्य आहे.

वजन कमी करायचं असल्यास -

अनेकदा काही अवघड किंवा किचकट गोष्टी साध्य करायच्या असल्यास आपण स्वतःला डेडलाईन किंवा चॅलेंज देतो. असं म्हणतात कुठलीही सवय बदलायला किंवा लावायला २१ दिवस लागतात. पहिल्या लॉकडाउनपासून असे २१ दिवस होऊन गेले. बऱ्याचदा कोणाबरोबर तरी किंवा प्रशिक्षकांच्या मदतीने आव्हान स्वीकारून त्यासाठी केलेले बदल व प्रयत्न अधिक परिणामकारक ठरतात. असे चॅलेंज स्वतःला द्या आणि जाडी कमी करण्याच्या दृष्टीने परिश्रम घ्या.

मानसिक आरोग्य –

अवघड परिस्थितीत देखील शांती, आनंद, उत्साह, सकारात्मकता टिकवणे ही आपल्या आंतरिक प्रगतीची लक्षणे आहेत. जे नाही ते घोळवत न बसता, जे आपल्याजवळ आहे ते मध्यवर्ती ठेवून आयुष्याकडे बघणे असा “Attitude of Gratitude” जोपासायला शिकलं पाहिजे. भीती, चिंता, अनिश्चितता, एकटेपणा, मानसिक थकवा हे सर्वत्र असूनही, अवघड परिस्थितीत डोकं शांत ठेवून मार्ग काढणे यासाठी योगाची साथ हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT