exercise 
health-fitness-wellness

व्यायाम सुरू करण्याआधी..! 

प्रणत पाटील

विशेषकरून बैठी जीवनपद्धती असलेल्या, चाळिशी पार, तसेच स्पेशल पॉप्युलेशनमधील मंडळींनी म्हणजेच दमा, हाडांचे रोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, अतिलठ्ठपणा आदी आजार असलेल्यांनी व्यायाम सुरू करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. व्यायामपूर्व तपासणीद्वारे डॉक्‍टर व फिटनेस मार्गदर्शकांकडून व्यायामाचे स्वरुप, कालावधी आणि वेग समजावून घ्यावे. स्वतःचा जीव धोक्‍यात घालून मिळवलेले तात्पुरते स्वास्थ्य खरेच गरजेचे आहे का? आपण वरून कसे दिसतो त्यापेक्षाही आपले आंतरिक स्वास्थ्य जपणे फार महत्त्वाचे आहे. इंग्रजीत एक छान म्हण आहे, Health is prior to fitness. आरोग्य ही फिटनेस आगोदरची गोष्ट आहे. 

तुमचे वाढलेले वजन अथवा पोट हा निव्वळ तुमच्या बिघडलेल्या आरोग्याचा दुष्परिणाम असून, हा दुष्परिणाम आपल्या शरीरांतर्गत असलेल्या अवयव व ग्रंथीच्या कामातील बिघाडांमुळे निर्माण झालेला असतो. बऱ्याच वेळा आपण जिममध्ये अशी वाक्‍ये ऐकलेली असतील. "आम्ही पूर्व खूप व्यायाम केला आहे. आम्हाला काय धोका !' लक्षात घ्या इतकी वर्षे व्यायामाअभावी आपल्या शरीरांतर्गत अनेक बदल झालेले असतात. त्यामुळे कधीही शून्यापासूनची सुरवात केलेली कधीही चांगली. आपल्या शरीरामध्ये घडत असलेल्या अनेक जैविक क्रिया, उदा. रक्तदाब, पचनक्रिया, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हार्मोन्सची पातळी आदींचे नियंत्रण व नियम न कोणत्याही औषधाशिवाय आपले शरीर करीत असले तरी आपण शरीराला पुरेसा वेळ देणे तितकेच गरजेचे आहे. 

याबरोबरच आपल्याला असलेल्या व्यसनांची माहितीही तज्ज्ञांना द्यायला हवी. डॉक्‍टर आणि वकिलांपासून काहीही लपवून ठेवू नये असे म्हणतात. त्यात आला व्यायाम प्रशिक्षकाचीही भर घालायला हवी. परदेशाप्रमाणेच आता आपल्याकडे शरीरस्थिती जाणून घेणारी प्रश्‍नावली संकल्पना राबवली जाऊ लागली आहे. त्यात तुमची सर्व वैद्यकीय इतिहास नमूद केलेला असतो. त्या प्रश्‍नावलीतून तुमचे शरीर कमी, मध्यम आणि उच्च यापैकी कोणत्या जोखीम श्रेणीत मोडते हे लक्षात येते. त्यानुसार तुमचा व्यायामाचा कार्यक्रम निश्‍चित होतो. 

शेवटी एकच सांगता येईल की, ससा आणि कासवाच्या शर्यंतीच्या गोष्टीप्रमाणे तुम्हाला कासवाच्या गतीनेच शर्यंत जिंकायची आहे पक्के लक्षात ठेवा. चांगले आरोग्य म्हणजे नक्की काय? चांगली झोप, चांगले पचन, वेदना व तणावविरहित कोणताही अतिरिक्त लालसा नसलेले चेतनामय जीवनच. मग याकरिता दीर्घकालीन ध्येय्य व वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून तुमची घौडदौड सुरू ठेवा. कारण "शरीर सलामत तो कसरत पचास' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचा संस्थापक अभिजीत दिपके भारतात येणार, आई-वडिलांना चिंता, घर सोडून अज्ञातस्थळी

पहिलीच मालिका गाजली तरीही छोट्या पडद्यावरून का गायब होती दीपा परब? स्वतः सांगितलं कारण, म्हणाली-

Salary System News: भारतीयांना आता महिन्यात दोन वेळा मिळणार पगार? कोणी दिला प्रस्ताव? कर्मचाऱ्यांच्या मनात उत्सुकता

INDW vs ENGW: वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाला बसला मोठा धक्का; इंग्लंडमध्ये खेळताना 'या' एका चुकीमुळे टीम इंडियाने मालिका गमावली!

Konkan MLC Bala Mane : कोकण विधान परिषद बिनविरोध, बाळ मानेंची माघार, ठाकरे गटाकडून मानेंची हकालपट्टी

SCROLL FOR NEXT