Heart attack Sakal
health-fitness-wellness

'या' पदार्थांचे सेवन करा; हार्ट अटॅकला दूर ठेवा

धमन्या सुरक्षित राहण्यासाठी काही खाद्यपदार्थ फायदेशीर ठरतात

सकाळ वृत्तसेवा

हार्ट अटॅक हा जगातील सर्वात मोठा जीवघेणा आजार मानला जातो. सेल Centers for Disease Control and Prevention च्या माहितीनुसार, चार जणांपैकी एका व्यक्तीच्या मृत्यूचं कारण हे हार्ट अटॅक असतं. मुळात हार्ट अटॅक येण्याचं कारण म्हणजे धमन्यांमध्ये प्लॅमा होऊन आतील बाजूने धमनी अरूंद होते. परिणामी रक्त योग्यरित्या प्रवाहित होण्यास अडथळा येतो आणि हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. धमन्या सुरक्षित राहण्यासाठी काही खाद्यपदार्थ फायदेशीर ठरतात. असेच काही पदार्थ आहेत जे तुमच्या धमन्यांना आतील बाजूने निरोगी ठेवून हृदयाला सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

जवस

जवसाचे मानवी शरीराला अनेक फायदे होतात. धमन्यांसाठी हे एक चांगलं सूपरफूड मानलं जातं. जवस बीजांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते त्याचसोबत ब्लड प्रेशर योग्य राहतं. यामुळे धमन्यांमध्ये रक्तांच्या गुठळ्या होत नाहीत.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात कॅटेचिन असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. एका संशोधनानुसार असं लक्षात आलं होतं की, ज्य़ा व्यक्ती नियमितपणे ग्रीन टीचं सेवन करतात त्यांचं हृदयाची संपूर्ण आरोग्य प्रणाली निरोगी राहते. त्याचप्रमाणे ग्रीन टी पिणाऱ्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा दोका 20 टक्क्यांनी कमी असतो.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमीन सी आणि कॅल्शियम असतं. ज्या धमन्यांचं नुकसान होण्यापासून संरक्षण होतं. त्याचप्रमाणे यामध्ये असलेल्या फायबरमुळे कोल्स्ट्रॉलची पातळी चांगली राहण्यास मदत होते.

हळद

भारतीय मसाल्यामध्ये हळद ही आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी मानली जाते. हळदीचा आहारात समावेश केल्याने धमन्यांचं नुकसान होत नाही आणि रक्ताच्या गुठळ्याही होत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT