heart. 
health-fitness-wellness

दिल धडक धडक के कहे रहा है! असे ठेवा हृदय सशक्त!

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आज, २९ सप्टेंबर. जागतिक हृदय दिन. आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी याबाबत जाणून घेणार आहोत. २००२ पासून जागतिक हृदय दिन साजरा करण्यास सुरूवात झाली. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, हृदयासंबंधीत आजारामुळे दरवर्षी १८०० कोटी रुग्णांचा मृत्यू होतो. अशात आपले हृदय सशक्त ठेवणे आवश्यक आहे. शिवाय सध्या कोरोनाच्या संकटकाळात त्याची खास काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी जाणून घेऊया काही टीप्स…

*ह्रदयविकाराचा झटका आला असेल तर त्वरित उपचार गरजेचे आहेत. रुग्णाला रूग्णवाहिकेतून ताबडतोब रूग्णालयात घेऊन जा. दरम्यान रुग्णाला प्राथमिक उपचार म्हणून कोणती औषधे द्यायची याविषयी डॉक्टरांशी फोनवरुन संपर्क साधा. त्या व्यक्तीस चालू देऊ नका. वेळेवर मिळणाऱ्या डॉक्टरी मदतीला ह्रदय रोगामध्ये अत्यंत महत्त्व आहे.

*ह्रदयरोग असलेल्यांनी पाठीच्या किंवा डाव्या हाताच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये.

*ह्रदयरोग असलेल्यांनी दररोज व्यायाम करून शारीरिकरित्या सक्रिय राहण्याचा प्रयत्न करावा. पायी चालणे अत्यंत महत्त्वाचे, एरोबिक्स आणि योगा यांसारख्या पर्यायांची निवड करू शकता. मेडीटेशन केल्याने तणामुक्त राहण्यास मदत होते.

*आपल्याकडे औषधांचा पुरेसा साठा आहे की नाही याची खात्री करून घ्या.

* संतुलित आहाराचे सेवन करा. निरोगी आणि सक्रीय रहा. जंकफुड, तेलकट, प्रक्रिया केलेले आणि खारट पदार्थांचे सेवन टाळावे. ताजी फळे, भाज्या, धान्य, कडधान्य, शेंगदाणे यांचा आहारात समावेश करायला विसरू नका. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी शारीरीक तपासणी करून घ्यावी. मेदयुक्त पदार्थ, कार्बोहायड्रेट आणि कृत्रिम चव असलेले पदार्थ खाऊ नये.

*आहारामध्ये कमीतकमी तेलाचा वापर करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुरेशी झोप घ्या आणि वळोवेळी शारीरीक विश्रांती घ्या.

*प्रियजनांशी मनमोकळ्या गप्पा मारा व तणामुक्त राहण्याचा प्रयत्न करा. आपल्याला पेंटिंग किंवा बागकाम आवडत असल्यास नक्कीच आपला वेळ यामध्ये गुंतविण्याचा प्रयत्न करा.

सविस्तर वाचा - माणसाला खऱ्या सुखाचा शोध

*गरज नसल्यास बाहेर न पडता टेलिमेडिसिन किंवा व्हिडिओ कॉल मार्फत सल्ला घेण्याचा पर्याय निवडा.

* ह्रदय रुग्णांनी रक्तदाब आणि मधुमेह यांच्या चाचण्या वेळेवारी करीत राहणे अत्यंत आवश्यक आहे.


संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT