Cough Syrup Warning eSakal
आरोग्य

Cough Syrup : चार वर्षांपेक्षा लहान मुलांना चुकूनही देऊ नका 'हे' कफ सिरप; DCGI ने दिला गंभीर इशारा

कफ सिरपमुळे जगभरात 141 बालकांचा बळी गेल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Sudesh

भारतीय ड्रग कंट्रोलर जनरल या संस्थेने एक गंभीर इशारा दिला आहे. चार वर्षांपेक्षा लहान मुलांना ठराविक कफ सिरप देण्यास मनाई केली आहे. 18 डिसेंबरला सर्व राज्यांना याबाबत पत्र पाठवण्यात आलं होतं. कफ सिरपमुळे जगभरात 141 बालकांचा बळी गेल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फिनाइलफ्राईन या दोन औषधांचं कॉकटेल वापरुन तयार केलेल्या कफ सिरपच्या पॅकेजिंगवर याचा स्पष्ट उल्लेख करावा असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. या दोन्ही औषधांचं मिश्रण करुन तयार केलेलं औषध हे सर्दीच्या लक्षणांवर उपचार म्हणून वापरलं जातं.

"क्लोरफेनिरामाईन मॅलेट आयपी 2MG आणि फिनाइलफ्राईन एचसीआय आयपी 5MG ड्रॉप/ML या फिक्स डोसच्या कॉम्बिनेशनला वापरण्यासाठी प्रोफेसर कोकाटे यांच्या समितीमार्फत एनओसी देण्यात आली आहे." असं या पत्रात म्हटलं होतं. अर्थात, चार वर्षांपेक्षा लहान वयाच्या बालकांना हे औषध देऊ नये असा इशाराही यात दिला आहे.

आपल्या कफ सिरपमध्ये ही औषधे असल्याचा उल्लेख रॅपरवर करण्यात यावा, तसंच चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हे देऊ नये असा इशाराही लेबलवर लिहावा असं DGCI ने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

तज्ज्ञांचं काय मत?

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ यांनी एका वृत्तवाहिनीला याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की एक वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांना आधीपासूनच हे औषध प्रिस्क्राईब केलं जात नाही. दोन ते चार वर्षांच्या मुलांना प्रिस्क्राईब जरी केलं, तरी अत्यंत कमी प्रमाणात आणि काळजीपूर्वक देण्यात यावं असा सल्ला दिला जातो. कारण याच्या अति डोसमुळे बाळ बेशुद्ध होण्याचा धोका असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT