Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : मनुक्यांचं पाणी प्या अन् अ‍ॅसिडिटी ते कॅन्सरपासून दूर रहा, जाणून घ्या

मनुकेच नाहीत तर मनुक्यांचे पाणीही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

सकाळ डिजिटल टीम

Benefits Of Raisin Water : मनुक्यांचे आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. आपण अनेक खाद्या पदार्थांमध्येही ते आवर्जून घालतो. पण आता फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी मनुका खाव्या. म्हणून त्याचा उत्तम फायदा मिळण्याच्या दृष्टीकोनातून कशा पध्दतीने मनूका खाव्यात ते सांगत आहोत. मनुकेच नाहीत तर मनुक्यांचे पाणीही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

  • मनुक्यांचे पाणी आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे एक उत्तम स्रोत मानले जाते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यापासून ते आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही मनुक्यांचे पाणी फायदेशीर आहे.

  • मनुक्यांचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होऊ शकते.

  • यकृताची मेटाबोलिझम प्रक्रिया सुधारते आणि आपले रक्त शुद्ध करण्यास मदत करते. हे पाणी आपले यकृत सहजपणे डिटॉक्स करते.

  • जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीची समस्या भेडसावत असेल तर मनुक्याचे पाणी पिणे एक उत्तम उपाय आहे. हे पाणी तुमच्या पोटातील अ‍ॅसिड नियंत्रित करते.

  • मनुक्यांच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट असतात जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या पाण्याचा दैनंदिन आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

  • सकाळी मनुक्यांचे पाणी प्यायल्याने वजनही कमी होण्यास मदत होते. मनुका फ्रुक्टोज आणि ग्लुकोजने समृद्ध असतात जे आपल्याला उर्जा देते. त्यामध्ये फायबरदेखील असते ज्यामुळे आपल्याला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते.

  • मनुक्यांचे पाणी आपले रक्त स्वच्छ करण्याचे काम करते आणि आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. हे आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकते आणि आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

  • मनुकामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराचे कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

मनुक्यांचे पाणी कसे तयार करावे?

मनुक्यांचे पाणी तयार करण्यासाठी आपल्याला पाणी, मनुका आणि लिंबू लागेल. दोन कप पाणी आणि १५० ग्रॅम मनुका घ्यावेत. एका पातेल्यात पाणी उकळावे. त्यात मनुके घालून रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी गाळून मंद आचेवर गरम करा आणि रिकाम्या पोटी प्या. जर तुम्हाला या पाण्याची चव वाढवायची असेल तर तुम्ही पाण्यात लिंबू घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT