Weight Loss Tips Sakal
आरोग्य

Weight Loss Tips दररोज सकाळी या बियांचे प्या पाणी, वजन घटेल व पचनप्रक्रियाही सुधारेल

Weight Loss Tips शरीराचे वजन कमी करण्यासाठी आपणही खूप मेहनत घेत आहात का? तर मग नियमित या बियांचे पाणी प्या.

Harshada Shirsekar

Weight Loss Tips शरीर सुडौल व आरोग्य निरोगी राहावे, यासाठी डाएट व वर्कआऊट या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पौष्टिक पदार्थांचे सेवन न केल्यास शरीरात विषारी घटक जमा होऊ लागतात आणि यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. 

ही समस्या टाळायची असेल तर डाएटमध्ये या औषधी बियांचा समावेश नक्की करून पाहा. या बिया तुमच्या किचनमध्ये सहजासहजी आढळतील देखील; या बिया म्हणजे धणे. धण्यांमध्ये कित्येक खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा साठा आहे. 

शिवाय यामध्ये अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. या बियांचे पाणी प्यायलात तर पचनसंस्थेचं कार्य सुरळीत होण्यास मदत मिळू शकते. धण्यांपासून वेटलॉस ड्रिंक कसे तयार करायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

धण्याचे पाणी कसे तयार करावे?  

  • धणे - अर्धा चमचा

  • पाणी - एक ग्लास 

रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर पाण्यात धणे भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी थोडेसे गरम करावे, उकळू नये. रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे. 

पचनप्रक्रिया सुधारते 

धण्याचे पाणी प्यायल्यास शरीराच्या पचनप्रक्रियेशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. याव्यतिरिक्त चयापचयाची क्षमता देखील सुधारते. 

वजन कमी होते

धण्याचे पाणी प्यायल्यास शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यास मदत मिळते. हे डिटॉक्स वॉटर प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त फॅट्स आणि विषारी घटक कमी होऊ शकतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण हे पाणी प्यायलात तर काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या शरीरात फरक जाणवेल. यासोबत काही साध्यासोप्या व्यायामांचाही सराव करावा. 

केसांनाही मिळतील फायदे

धण्याच्या पाण्याद्वारे शरीराला व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए या पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. ज्यामुळे केसांच्या आरोग्यास अगणित लाभ मिळतात. यामुळे केसगळतीची समस्या देखील कमी होते. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : अवघी पंढरी विठ्ठलमय! 20 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

SCROLL FOR NEXT