Swasthyam 2022 esakal
आरोग्य

Swasthyam 2022: इस्टंट ग्रॅटिफिकेशन मेन्टॅलिटी आरोग्यासाठी घातक! वाचा सविस्तर

काहीजन डाएट प्लान वजन कमी करण्यासाठी बनवतात तर काही जण हेल्दी राहाण्यासाठी हे करत असतात

साक्षी राऊत

Instant Gratification Mentality: बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांना अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे हेल्दी राहाण्यासाठी लोक वेगवेगळे डाएट चार्ट बनवत ते फॉलो करतात. काहीजन डाएट प्लान वजन कमी करण्यासाठी बनवतात तर काही जण हेल्दी राहाण्यासाठी हे करत असतात. रिझल्ट मिळाले की लगेच बदलतताही. त्याने तुमच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतात ते जाणून घेऊया.

सकाळ समुहाने राबवलेल्या स्वास्थम 2o22 या कार्यक्रमात लोकांना निरोगी आरोग्याबाबत नुपूर पाटील या आरोग्य तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या मार्गदर्शनानंतर निश्चितच लोकांचे डाएट प्लान बाबत असलेले गैरसमज दूर होण्यास मदत झाली.

इस्टंट ग्रॅटिफिकेशन मेंटॅलिटी म्हणजे काय?

हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण समजून घेऊया. ऑनलाईन ऑर्डरींगमुळे आज ऑर्डर केलं की लगेच दोन दिवसांत कुठलीही गोष्ट आपल्याला घरपोच मिळते. त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. अशीच सध्या आपलीही मनोनवृत्ती होऊन बसली आहे.

त्यामुळे झटपट कसा रिझल्ट मिळेल याच्याच शोधात आपण असतो. त्यामुळे १० दिवसांते एवढे तर तीस दिवसांत तेवढे वजन कमी करणारा डाएट असल्या जाहिरांतीच्या मोहात पडत तुम्ही ते अगदी काही विचार न करता फॉलो करता. मात्र जेव्हा रिझल्ट मिळत नाही तेव्हा तुम्ही तो डाएट सोडूत आणखी एक नवा डाएट फॉलो करता.

सतत डाएट बदलण्याचे गंभीर परिणाम

सतत डाएट बदलण्याने तुम्हाला आता जरी त्याचे गंभीर परिणाम दिसत नसले तरी कालांतराने तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम जाणवायला लागतील. त्याने तुमचा इम्युनिटी पॉवर कमी होतो. काही जणांचे तर वजन दुप्पट वाढते. त्यामुळे सतत डाएट बदलण्याची चूक तुम्ही करू नका.

काय सांगतात तज्ज्ञ?

न्यूट्रिशनीस्ट नुपूर यांनी सांगितले की, कुठल्याही गोष्टीचा परिणाम हा सहजासहजी मिळत नाही. तुम्हाला त्यासाठी धैर्य ठेवावे लागेल. तेव्हा सतत डाएट बदलण्यापेक्षा एकच डाएट व्यवस्थित फॉलो करा. आणि तुमचं डाएट तुमच्या आरोग्यासाठी बरोबर आहे ना याची खात्री करून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT