Swasthyam 2023 environment of the universe palnet
Swasthyam 2023 environment of the universe palnet sakal
आरोग्य

Swasthyam 2023 : ब्रह्मांडाचे पर्यावरण

सकाळ वृत्तसेवा

पर्यावरणाची संकल्पना समजावून घेण्यासाठी आपल्याला पर्यावरण कसे अस्तित्वात आले आणि त्याची व्याप्ती काय आहे, हे समजून घ्यावे लागेल.

- अशोक तातुगडे

पर्यावरणाची संकल्पना समजावून घेण्यासाठी आपल्याला पर्यावरण कसे अस्तित्वात आले आणि त्याची व्याप्ती काय आहे, हे समजून घ्यावे लागेल. मानवाची विश्वाची संकल्पना कालानुसार बदलत गेली. विश्वामध्ये चंद्र, सूर्य, ग्रह आहेत.

ग्रह पूर्वेकडे उगवतात आणि पश्चिमेकडे मावळतात. विश्वात हवा, प्राणी, पक्षी, जलचर तसेच समुद्र, पर्वत, नद्या तलाव, माती आदीही आहेत. काही वेळेला पाऊस पडतो, काही वेळेला थंडी असते काही वेळेला कडक ऊन असते या सर्वांची माहिती मानवाला उत्क्रांतीनंतर झाली. त्यातूनच त्याला पर्यावरणाची प्राथमिक ओळख झाली. म्हणजे हवा पाणी अग्नी, माती या सर्वांचा अभ्यास करावा लागला.

पृथ्वी चेंडूप्रमाणे गोलाकार आहे. पृथ्वीभोवती सूर्य फिरत नसून, सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह फिरतात आदी माहिती झाली. त्यानंतर साहजिकच माणसाच्या नैसर्गिक कुतुहलामुळे त्याने पृथ्वीच्या पलीकडेही काय आहे याचा शोध घेणे सुरू केले.

फक्त सूर्य आणि त्याची ग्रहमाला याच्याशिवाय अनेक विविध तारे विविध तेजोमेघ, नवतारे, तारका समूह अशी विश्व रचनेच्या विविध अंगाची माहिती होत गेली. आपल्या विश्वाची प्रचंड व्याप्ती काही प्रमाणात मोजता आली.

सूर्य आणि पृथ्वी यातले अंतर १५ कोटी किलोमीटर आहे. याला खगोलीय एकक असे म्हणतात. प्रकाश हा प्रत्येक सेकंदाला तीन लाख किलोमीटर प्रवास करतो. पृथ्वीचे सुरुवातीच्या काळात प्रचंड तापमान होते आणि तो एक अग्नीचा गोळा होता. त्यानंतर पृथ्वी थंड होत गेल्यानंतर सध्याच्या पृथ्वीची रचना अस्तित्वात आली.

पृथ्वीच्या गाभाऱ्यात अजूनही उकळता लाव्हारस आहे. पृथ्वीचा पृष्ठभागाखालील भाग, पृष्ठभाग आणि पृष्ठभागाच्या वरील असलेले हवेचे आवरण आणि त्यात असलेल्या इतर सजीव, निर्जीव गोष्टी यांचेच मिळून पर्यावरण तयार होते. भारतीय प्राचीन परंपरेच्या ज्ञानानुसार हे ब्रह्मांड आकाश, वायू ,अग्नी, जल आणि पृथ्वी या पाच तत्त्वांचे मिळून झाले आहे.

आकाशाची पोकळी, कित्येक दीर्घिका, असंख्य तारे, अनेक सूर्य, ग्रह, त्यांचा एकमेकांवर होणारा परिणाम, अनेक चंद्र, निरनिराळे वायू, हवामान, मूलद्रव्य, विविध प्रकारची बले, उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण. या शिवाय पृथ्वीसारख्या ग्रहावर असणारी प्राणी व वनस्पती यांची जीवसृष्टी. पुढील लेखात पृथ्वीच्या पर्यावरणाविषयी सविस्तर माहिती घेऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT