Term Corporate Yoga esakal
आरोग्य

Term Corporate Yoga : ऑफीसमध्ये बसून काम केल्याने पाठीचे दुखणं लागलंय? खूर्चीतच करा हे व्यायाम

घर व ऑफिस किंवा कामाचे ठिकाण हे खूप दूर असल्याने अनेक जणांना वेळच मिळत नाही.

सकाळ डिजिटल टीम

Term Corporate Yoga : कार्यालयीन योग, म्हणजेच सध्याचे टर्म कॉर्पोरेट योग याबद्दल जाणून घेणार आहोत. सध्याचे आयुष्य अतिशय धावपळीचे, तणावाचे आहे. ते प्रसन्न, आनंदी करण्यासाठी योगसाधना, व्यायाम, प्राणायाम, ध्यान करणे खूप आवश्यक आहे. मात्र, यासाठीच काही जणांकडे वेळ नाही. घर व ऑफिस किंवा कामाचे ठिकाण हे खूप दूर असल्याने अनेक जणांना वेळच मिळत नाही. अशा व्यक्तींना त्यांच्या कार्यालयातच बसून काही व्यायाम, आसने करता येतील.

बराच वेळ मोटार चालवून किंवा एकाच जागी बसून पाठदुखी सुरू होते. लवचिकता कमी होते, तसेच व्यायाम-योगसाधनेच्या अभावामुळे पोट, चरबी वाढते. अपचनाचा त्रास सुरू होतो. तणावाची पातळीही वाढते. अशा अनेक समस्या डोके वर काढू लागतात. या सर्वांवर उपयोगी म्हणजे योगसाधना. आपल्याला सहजतेने काही आसनप्रकार करता येतात. त्याचा नित्य सराव ठेवल्यास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभते.

असे करावे आसन

  • ऑफिसमध्ये कोणत्याही वेळी तुम्ही २ ते ५ मिनिटे वेळ काढून हे स्ट्रेचस, आसने करू शकता.

  • या प्रकारामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल.

  • या आसनाचा प्रकार अगदी सोपा आहे.

  • खुर्चीवर ताठ बसावे.

  • दोन्ही तळपायाकडची बाजू जमिनीवर टेकलेली असावी.

  • गुडघे व टाच एका सरळ रेषेत येतील अशी स्थिती ठेवावी.

  • दोन्ही हात श्वास घेत वरच्या दिशेला ताणून घ्यावेत.

  • या स्थितीत १० ते १५ सेकंद तरी थांबावे.

  • श्वास संथ सुरू ठेवावा. त्यानंतर श्वास सोडत सावकाश हात खाली घ्यावेत.

  • अशी कृती किमान पाच वेळा करावी.

आसनाचे फायदे

  • आळस कमी होतो. पाठीचा कणा ताणला गेल्याने तो अधिक लवचिक व सशक्त होतो.

  • बराच वेळ बसल्याने किंवा पाठीला रग लागली असल्यास ती कमी होते.

  • खांद्यांचे जॉइंटस् मोकळे होतात.

  • हाताच्या स्नायूंना ताण बसल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते. हाताला मुंग्या येण्याचे किंवा हात दुखण्याचे प्रमाण कमी होते.

  • पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

  • पोश्चर सुधारण्यास उपयोग होतो.

  • पान, खांदे, पाठ यांवर आलेला अतिरिक्त ताण कमी होतो.

  • हा प्रकार सर्वांनीच करून पाहावा. यालाच आपण खुर्चीत बसूनचे ताडासन असेही म्हणू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT