World Cancer Day 2024 esakal
आरोग्य

World Cancer Day 2024 : भारतात झपाट्याने वाढतोय तोंडाचा कर्करोग, 'या' गंभीर लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. मागील काही वर्षांपासून भारतात तोंडाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. तोंडाच्या कर्करोगामध्ये ओठ, जीभ, तोंड, टाळू आणि घशाचा समावेश होतो.

Monika Lonkar –Kumbhar

World Cancer Day 2024 : कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. मागील काही वर्षांपासून भारतात तोंडाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तोंडाच्या कर्करोगामध्ये ओठ, जीभ, तोंड, टाळू आणि घशाचा समावेश होतो. या कॅन्सरवर लवकर उपचार न केल्यास हे जीवघेणे ठरू शकते.

मात्र, जर सुरूवातीच्या टप्प्यातच यावर उपचार करण्यात आले तर हा कर्करोग बऱ्यापैकी नियंत्रणात येऊ शकतो.

तोंडाचा कॅन्सर हा प्रामुख्याने धूम्रपान केल्याने होतो. प्रामुख्याने तंबाखूचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हा तोंडाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते.

तोंडाचा कर्करोग हा प्राथमिक टप्प्यात आढळून आल्यास त्यावर लवकरात लवकर उपचार करणे शक्य होते. मात्र, त्यासाठी याची सुरूवातीची लक्षणे ओळखणे हे फार महत्वाचे आहे. आज जागतिक कर्करोग दिन आहे. या दिनानिमित्त आज आपण तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती आहेत? ते जाणून घेणार आहोत.

तोंडात पांढरे-लाल डाग दिसणे

तोंडात पांढरे किंवा लाल डाग दिसणे. तोंडाला आतून सूज येणे. तोंडाच्या आतील भागात, जिभेवर, दातांच्या जवळपास, किंवा दाढी आणि हिरड्यांजवळ ओबडधोबड खड्डे पडणे. हे खडबडीत ठिपके दिसून आल्यास त्वरीत डॉक्टरांना संपर्क साधावा. या छोट्या-मोठ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तोंडाच्या कर्करोगाचे हे प्रमुख लक्षण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

तोंडाच्या आतील भागात रक्तस्त्राव होणे

जर तुमच्या तोंडाच्य आतील भागात सतत रक्तस्त्राव होत असेल तर, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्वरीत तुमच्या जवळच्या डॉक्टरांना संपर्क साधा. तोंडाच्या कर्करोगाचे हे सुरूवातीच्या टप्प्यातील प्रमुख लक्षण असू शकते.

तोंडात वेदना होणे

तोंडाच्या किंवा मानेजवळच्या भागात अस्पष्ट बधिरपणा जाणवणे, सूज येणे किंवा सतत वेदना होणे इत्यादी लक्षणे ही तोंडाच्या कर्करोगाची असू शकतात. त्यामुळे, या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

तोंडाच्या आतील भागात जखमा होणे

तोंडाच्या आतील भागात, चेहऱ्याजवळ किंवा मानेवर सतत फोड येणे. या फोडांमुळे वारंवार रक्तस्त्राव होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. जर या फोंडामुळे निर्माण होणाऱ्या जखमा २ आठवड्यांच्या आत बऱ्या होत नसतील तर त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या. तोंडाच्या कर्करोगाचे हे प्रमुख लक्षण असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT