Cyawanprash Disadvantages esakal
आरोग्य

Chyawanprash Disadvantages: या रूग्णांनी चुकूनही च्यवनप्राश खाऊ नये; नाहीतर...

तुमच्यासाठी हा पदार्थ घातक कसा ठरू शकतो ते आपण जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

प्रत्येकालाच आरोग्याची काळजी असते. परंतु आपल्याच चुकांमुळे आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. हिवाळ्यात आपण आरोग्याची विशेष काळजी घेतो. सहसा आपल्या शरीराला उब मिळेल असे पदार्थ आपण खातो. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे च्यवनप्राश. च्यवनप्राशचे अनेक फायदे (Chyawanprash Benefits) आपल्या शरीरासाठी आहेत. मात्र तुमच्यासाठी हा पदार्थ घातक कसा ठरू शकतो ते आपण जाणून घेऊया.

च्यवनप्राश हे औषध असलं तरी च्यवनप्राश खाणं 'या' लोकांनी वेळीच टाळावे. च्वयनप्राश खाल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. च्यवनप्राशमध्ये मध, साप केशर, पांढरी मुसळी आणि तमालपत्र यांसारखे गुणधर्म असतात. तसेच यांचे मिश्रण त्यात असते. त्यामुळे हे आरोग्यासाठी पोषक असते. परंतु काही लोकांनी च्यवनप्राश सेवन करणं टाळावे. कोणत्या लोकांनी च्यवनप्राशचे सेवन करू नये? चला जाणून घेऊया.

या रूग्णांनी च्यवनप्राश अजिबात खाऊ नये

1. मधुमेह रूग्ण -

मधुमेहाच्या रूग्णांनी चुकूनही च्यवनप्राश खाऊ नये. बरेच लोक च्यवनप्राशची चव संतुलित ठेवण्यासाठी त्यात साखर घालतात मात्र असे करणे टाळावे. च्यवनप्राश खाल्ल्यानं या रूग्णांच्या शरीरात साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहाच्या रूग्णांनी च्यवनप्राश खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचा धोका वाढतो.

2. किडनी पेशंट -

च्यवनप्राशच उष्ण असल्यानं ते पचायला अत्यंच जड जाते. जर तुम्हाला किडनी संबंधित कुठलेही आजार असतील अथवा तुम्हाला कुठला त्यासंबंधी रोग असेल तर तुम्ही च्यवनप्राश खाणं टाळलं पाहिजे.

3. पोटाचे विकार -

ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी च्यवनप्राशचे सेवन करू नये. च्यवनप्राश हे पचायला जड असते त्यामुळे शक्यतो पोटाच्या समस्यांनी जर तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही च्यवनप्राश खाऊ नका. काहींना भरपेट जेवल्यानंतरही च्यवनप्राश खायची सवय असते. त्यामुळे त्यांना नंतर अपचन किंवा पोटाच्या समस्या वाढू लागतात तेव्हा अशांनी च्यवनप्राश खाऊ नये.

4. ब्लड प्रेशर (BP Patient) रूग्ण -

जर तुम्ही हाय ब्लड प्रेशरचे रूग्ण असाल तर तुम्ही च्यवनप्राशचे सेवन टाळावे कारण च्यवनप्राशची उष्णता तुम्हाला त्रासदायक ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

IPL 2026 : शाsssणा... Rohit Sharma ने कुलदीप, लोकेश यांना 'मामू' बनवलं; प्रसंग सांगताना हिटमॅन खळखळून हसला Video

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

"मी पैशांसाठी बिग बॉस केलं" लपंडाव फेम रुपालीचा धक्कादायक खुलासा ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT