Hair Remove Tips: Sakal
आरोग्य

Hair Remove Tips: नको असलेले केस काढण्यासाठी व्हॅक्सिंग, शेव्हिंग की लेझर ?कोणत्या गोष्टींचा वापर योग्य

Hair Remove Tips: शरीरावर आणि चेहऱ्यावर नको असलेले केस काढण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करावा हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.

Puja Bonkile

Hair Remove Tips: सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला शरीरावरचे नको असलेले केस काढतात. यासाठी त्या केस काढण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करतात. यामध्ये व्हॅक्सिंग, लेझर आणि शेव्हिंगचा वापर करतात. पण यापद्धतींचे काही फायदे आणि तोटे देखील आहेत.

व्हॅक्सिंग

शरीरावरचे नको असलेले केस काढण्यासाठी व्हॅक्सिंगचा सर्वात जास्त वापर केला जातो. यामध्ये चिकट पदार्थ लावला जातो आणि एका पट्टीचा वापर करून केस मुळापासून निघून जातात. यामुळे त्वचा कोमल राहते आणि केस लवकर येत नाहीत असे तज्ज्ञांचे मत आहे.

फायदे

व्हॅक्सिंग हा अक झटपट उपाय आहे. यामुळे केस मुळापासूवन निघतात आणि लवकर येत नाहीत. तसेच शरीर देखील उजळ दिसते.

तोटे

व्हॅक्सिंग करणे वेदनादायक असते. ज्यांची त्वचा खुप संवेदनशील असते त्यांना जास्त त्रास होता. त्वचेवर लालसरपणा किंवा पुरळ येतात. काहींना अॅलर्जी होते.

शेव्हिंग

नको असलेले केस काढण्यासाठी शेव्हिंग हा एक सोपा आणि सरळ उपाय आहे. केस काढण्यासाठी रेझरचा वापर केला जातो.

फायदे

रेझरचा वापर करून स्वत:चा केस काढू शकतो. यामुळे ही पद्धत सोपी आहे. तसेच केस आणि मृत त्वचा सहज निघून जाते. शेव्हिंग करताना वेदना होत नाही.

तोटे

शेव्हिंग केल्याने त्वचेवरचे केस निघून जातात. पण केसांची लवकर वाढ होते. काळजी घेतल्यास त्वचेला जळजळ होऊ शकते. ब्लेड वापरताना काळजी घ्यावी.

लेझरचा वापर

लेझरचा वापर करून केस काढले जातात. यामध्ये केस न पुन्हा वाढत नाहीत. लेझरमुळे केस मुळांचून नष्ट होतात. यामुळे त्वेचवर परिणाम न करता केस निघून जातात.

फायदे

लेझरचा वापर करून केस काढल्याने केसांची वाढ लवकर होत नाही.

ज्या लोकांचे केस जास्त वाढतात त्यांसाठी ही पद्धत योग्य आहे. यामुळे वेदना होत नाही. तसेच बारिक केस देखील सहज काढता येतात.

तोटे

लेझरने केस काढणे वेळखाऊ आणि महागडी आहे. त्वचेवर लालसरपणा, सुज येणे यासारख्या समस्या येतात. त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

क्रीम आणि पावडर

अनेक लोक नको असलेले केस काढण्यासाठी क्रिम आणि पावडरचा वापर करतात. ही सर्वात सोपी पद्धत आहे. यामुळे वेदना होत नाही.

फायदे

ही सर्वात सोपी आणि साधी पद्धत आहे.

घरीच वापर करू शकता.

यामुळे वेदना होत नाही.

यामुळे त्वचा नाजूक होते.

तोटे

क्रिम आणि पावडरचा वापर केल्याने अनेकांना जळजळ होऊ शकते.

केस लवकर येतात.

कोणत्या पद्धतीचा वापर करावा?

केस काढण्यासाठी त्याची वाढ, प्रकार लक्षात घेऊन पद्धतीचा वापर करावा. तज्ज्ञांच्या मते तुमच्या गरजेनुसार लेझर, व्हॅक्सिंग किंवा शेव्हिंगचा वापर करू शकता. तसेच त्वचेवर जळजळ किंवा लालसरपणा येत असेल तर सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT