Types Of Meditation esakal
आरोग्य

Types Of Meditation : मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या मेडिटेशनचे ‘हे’ प्रकार माहित आहेत का?

मेडिटेशन केल्याने मानसिक शांती आणि समाधान मिळते.

Monika Lonkar –Kumbhar

Types Of Meditation : निरोगी जीवनशैलीसाठी योगा आणि मेडिटेशन करणे फायद्याचे आहे. योगामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात आणि मेडिटेशन केल्याने मानसिक शांती मिळते. त्यामुळे, निरोगी जीवनशैलीसाठी योगा आणि मेडिटेशन नियमितपणे करणे महत्वाचे ठरते.

मेडिटेशन केल्याने निद्रानाश, ताण-तणाव, चिंता इत्यादी मानसिक समस्या नियंत्रित करण्यास मदत होते. योगामुळे शरीर रिलॅक्स होते तर मेडिटेशन केल्याने मानसिक शांती आणि समाधान मिळते.

मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मेडिटेशन करणे फायद्याचे ठरते. मेडिटेशनचे अनेक प्रकार आहेत, हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण मेडिटेशनचे प्रकार जाणून घेणार आहोत.

प्रेम कृपा मेडिटेशन

हा मेडिटेशनचा प्रकार अतिशय खास आहे. या मेडिटेशनच्या प्रकारामध्ये तुम्हाला तुमच्या प्रेमळ भावना जागृत करायच्या असतात. करूणा आणि दयाळूपणा या भावना आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाच्या आणि आवश्यक आहेत.

आपल्या आयुष्यात जे आहे ते सर्व चांगले आहे आणि आपल्या आसपासचे लोक चांगले आहेत. ही भावना तुम्हाला मानसिकरित्या मजबूत बनवते. या मेडिटेशनमध्ये ताण-तणाव दूर होतो आणि लोकांप्रती तुमची वागणूक बदलण्यास मदत होते.  

माईंडफुलनेस मेडिटेशन

या माईंडफुलनेस मेडिटेशनमध्ये तुमचा मेंदू सजग आणि सतर्क राहण्यास मदत होते. शिवाय, अनेक मानसिक आजार जसे की, नैराश्य, ताण-तणाव, निद्रानाश इत्यादी समस्या दूर होतात.

हे मेडिटेशन केल्याने तुम्ही स्वत:ला सद्य परिस्थितीमध्ये जागरूक आणि उपस्थित ठेवता. ही एक प्रकारची संज्ञानात्मक चिकित्सा असल्यामुळे तुमचे मन रिलॅक्स आणि रिफ्रेश होण्यास मदत होते.

विपश्यना मेडिटेशन

विपश्यना मेडिटेशन हे बहुधा अनेकांना माहित आहे. भारताची सर्वात प्राचीन मेडिटेशन चिकित्सा म्हणून या विपश्यना मेडिटेशनची खास ओळख आहे. या मेडिटेशनमध्ये आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याची कला विकसित केली जाते. आंतरिक शांतीसाठी आपले मन शांत केले जाते.

या मेडिटेशनमध्ये तुम्हाला संपूर्णपणे वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागते. तसेच, भूतकाळ आणि भविष्यकाळातील विचारांमधून तुम्हाला बाहेर यावे लागते. या मेडिटेशनमुळे तणाव कमी होतो आणि चिंता दूर होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT