World Heart Day 2023 esakal
आरोग्य

World Heart Day 2023 : जास्त स्ट्रेस अन् हृदयाचं होईल नुकसान थेट! एक्सपर्ट्स सांगतात साइड इफेक्ट्स

स्ट्रेस काही काळापूर्ती असेल तर तो सामान्य असतो मात्र दीर्घकाळ स्ट्रेस शारीरिक आणि मानसिकरित्या धोक्याचा ठरतो

साक्षी राऊत

World Heart Day 2023 : आयुष्यात कुठलीही अडचण आली की व्यक्तीची स्ट्रेस लेव्हल वाढते. स्ट्रेस काही काळापूर्ती असेल तर तो सामान्य असतो मात्र दीर्घकाळ स्ट्रेस शारीरिक आणि मानसिकरित्या धोक्याचा ठरतो. याचा परिणाम तुमच्या हृदयावरही होतो. याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळा व्यक्तीस स्ट्रेस असल्यास शरीरात स्ट्रेस हार्मोन तयार होण्यास सुरुवात होते. या हार्मोनला कॅटेक्लोमाइन्स असे म्हणतात. स्ट्रेस हार्मोनला शरीरातील स्ट्रेस लेव्हल कमी करण्यासाठी अधिक ऑक्सिसजनी गरज असते. दीर्घकाळापर्यंत शरीराला जास्त ऑक्सिजनची गरज भासल्यास हृदयावरसुद्धा ताण पडतो. ज्यामुळे हृदयाच्या आकारात बदल, हृदयाचे असामान्य ठोके आणि कोरोनरी व्हेसल्स आकुंचन पावणे यांसारखे समस्या उद्भवतात.

स्ट्रेस हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक

अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, स्ट्रेस लेव्हल तुमच्या आर्टेरिज ब्लॉक करण्यास कारणीभूत ठरतात. शरीरात दीर्घकाळ स्ट्रेस हार्मोनची निर्मिती झाल्यास ब्लड शुगर, ब्लड कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसेराइड्सचे प्रमाण वाढते. ज्याचा प्रभाव हृदयाच्या आरोग्यावर होतो. (Health)

इमोशनल स्ट्रेसचाही हृदयावर परिणाम होतो

इमोशनल स्ट्रेसमुळे व्यक्तीची झोप प्रभावित होते. बरेच दिवस पूर्ण झोप न झाल्यास एकाग्रता कमी होते. तसेच कामाच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम होतो. यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढते. अति स्ट्रेसमुळे लठ्ठपणासुद्धा वाढतो.

एका अध्ययनातून अशी माहिती पुढे आली आहे की, स्ट्रेसमुळे ब्रोकन हार्ट सिंड्रोम हा आजार होतो. ज्यामध्ये हृदयाचा एक भाग कमकुवत होतो. ज्यामुळे हृदयाची पंपिंग पॉवरसुद्धा कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT