World Heart Day  esakal
आरोग्य

World Heart Day : हाय ब्लड प्रेशरचेही असतात 5 प्रकार, तज्ज्ञ सांगतात बचावासाठीचे 8 उपाय

चला तर वर्ल्ड हार्ड डे च्या निमित्ताने हाय ब्लड प्रेशरचे प्रकार आणि त्यावर उपाय जाणून घेऊया

साक्षी राऊत

World Heart Day : उच्च रक्तदाबाचे अनेक प्रकार असतात. त्याप्रमाणे त्याची लक्षणेही वेगवेगळी असतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार घेत उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतं. याशिवाय काही घरगुती उपायांनीसुद्धा उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवता येते. दरवर्षी २९ सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे साजरा केला जातो. चला तर वर्ल्ड हार्ड डे च्या निमित्ताने हाय ब्लड प्रेशरचे प्रकार आणि त्यावर उपाय जाणून घेऊया.

उच्च रक्तदाब ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे धमण्या प्रभावित होतात. या स्थितीत रक्तप्रवाह धमण्यांमध्ये वेगाने होतो ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करणे कठीण होते.

डॉ. अमित भूषण शर्मा यांच्या मते, एका व्यक्तीचे सामान्य ब्लड प्रेशर १२०/८० मिमि एचजी असते. उच्च रक्तदाबात विशेषत: गंभीर डोकेदुखी, छातीचे दुखणे, गिरकी येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चिंता अशी अनेक लक्षणे दिसून येतात.

हाय ब्लड प्रेशरचे प्रकार

१) प्रायमरी उच्च रक्तदाब - ही समस्या खराब आहार, खराब जीवनशैली, वय, स्ट्रेस आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे उद्भवते. योग्य आहार आणि जीवनशैली रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर ठरू शकते.

२) सेकंडरी उच्च रक्तदाब - या स्थितीत फक्त औषधोपचार आणि सर्जरीनेच रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. यात धमण्या आकुंचण पावणे, हार्मोनल असंतुलन, थायरॉइड यांसारखी लक्षणं दिसून येतात.

३) रेझिस्टंट हायपरटेन्शन : हा उच्च रक्तदाब औषधांनीही आटोक्यात आणणे अशक्य आहे. सेकंडरी उच्च रक्तदाबाप्रमाणेच, या प्रकारची कारणे देखील अज्ञात असू शकतात. एकदा कारण ओळखले की, रुग्णांवर औषधोपचार करून यशस्वीपणे उपचार केले जाऊ शकतात.

४) घातक उच्चरक्तदाब : हा उच्च रक्तदाबाचा सर्वात गंभीर प्रकार आहे ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि अनेक अवयवांचे नुकसान होते.

५) पृथक सिस्टोलिक उच्चरक्तदाब: वृद्ध, प्रौढ लोकांमध्ये हा उच्च रक्तदाबाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. रक्तवाहिन्या कडक झाल्यामुळे हा प्रकार उद्भवतो. (World Heart Day)

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीचे सोपे उपाय

  • वजन नियंत्रित करा

  • नियमित व्यायाम

  • संतुलित आहार (सोडियमचे कमी सेवन)

  • अल्कोहोल सेवनावर मर्यादा

  • धूम्रपान सोडणे

  • तणाव कमी करा

  • पुरेशी झोप

  • नियमित तपासणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT