World Malaria Day 2024: Sakal
आरोग्य

World Malaria Day 2024: मलेरिया कशामुळे होतो? मलेरियाची लक्षणे कोणती? जाणून घ्या सविस्तर

World Malaria Day 2024: हिवताप हा आजार ‘प्लासमोडियम’ या परोपजीवी जंतूंपासून होतो. हे जंतू ‘ॲनाफिलस’ मादी डासांद्वारे प्रसारित होतात.

सकाळ वृत्तसेवा

Malaria Day 2024: आज (ता. २५ एप्रिल) जागतिक हिवताप दिन आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक हिवताप दिनानिमित्त या वर्षाचे घोषवाक्य ‘मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करूया लढा मलेरियाला हरविण्यासाठी’ असे ठरविले आहे.

हिवताप हा आजार ‘प्लासमोडियम’ या परोपजीवी जंतूंपासून होतो. हे जंतू ‘ॲनाफिलस’ मादी डासांद्वारे प्रसारित होतात. महाराष्ट्रामध्ये हिवतापाच्या जंतूंचे व्हायव्हॅक्स व फॅलसीफेरम हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. मलेरियाच्या जंतूंचा अधिशयन काळ १० ते १२ दिवसांचा आहे.

हिवतापाची लक्षणे

  • थंडी वाजून ताप येणे.

  • ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो.

  • नंतर घाम येऊन अंग गार पडते.

  • ताप आल्यानंतर डोके अतिशय दुखते.

  • बऱ्याचवेळा उलट्याही होतात.

रोग निदान :

प्रयोगशाळेत रक्त नमुना तपासणी करून हिवतापाचे खात्रीशीर निदान करता येते. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतू आढळतात.

औषधोपचार :

रक्त नमुना तपासणीच्या अंती हिवतापाच्या प्रकारानुसार वयोगटाप्रमाणे औषधोपचार दिला जातो. यामध्ये पी.व्ही. रुग्णास क्लोरोक्विन तीन दिवस व प्रायमाक्विन गोळ्यांचा औषधोपचार १४ दिवस देण्यात येतो. पी.एफ. रुग्णांस ए.सी.टी. गोळ्या (आर्टिसुनेट कॉम्बिनेशन थेरपी) तीन दिवस व दुसऱ्या दिवशी प्रायमाक्विन गोळ्याची मात्रा वयोगटाप्रमाणे देण्यात येते.

अशी घ्या दक्षता

  • ही औषधी उपाशीपोटी घेऊ नका.

  • गर्भवती माता, एक वर्षाखालील बालक आणि जी. सिक्स, पी.डी. ची कमतरता असणाऱ्या या रुग्णांना प्रायमाक्विन देऊ नये.

  • औषधोपचार आरोग्य यंत्रणेच्या देखरेखी खाली देणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

RICH ZODIAC SIGNS: या राशींच्या लोकांकडे अचानक येतो इतका पैसा की जगतात हवं तसं आयुष्य! मेहनत आणि भाग्य दोन्हींची मिळते साथ

Marathi News Live Updates: MPSC पेपरफुटी चौकशी समितीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंना अद्याप लेखी आदेशच नाही

Manchar News : मंचर एसटी आगाराच्या ताफ्यात ‘जिजाऊं’ची भरारी; पाच नव्या एसटी बस दाखल, लवकरच अजून पाच एसटी बस मिळणार

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT