weekly horoscope 22nd january 2023 to 28th january 2023
weekly horoscope 22nd january 2023 to 28th january 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (२२ जानेवारी २०२३ ते २८ जानेवारी २०२३)

श्रीराम भट saptrang@esakal.com

पूर्वसंचितातून लाभ होणार

मेष : सप्ताह बुद्धिजीवींना प्रगतीची दालनं घडून देणारा. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभाची शुक्र-शनी युती गणेशजन्माच्या सप्ताहात पूर्वसंचितातून लाभ देणारी. श्रद्धावंतांना प्रचिती. कलाकारांना सूर गवसेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ वास्तुयोगाचा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात रथसप्तमी विजयोत्सवाची.

काही स्वप्नं पूर्ण होतील

वृषभ : ग्रहांचा एक छान ट्रॅक राहील. ता. २५ व २६ हे दिवस तरुणांना जल्लोषाचेच. विशिष्ट स्वप्नं पूर्ण होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचा दबदबा वाढेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनात ता. २६ ची वसंत पंचमी कौटुंबिक जीवन भावसमृद्ध करेल. नोकरीत प्रशंसा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातून सुवार्ता.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

मिथुन : मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह शुक्राच्या राश्‍यंतरातून जीवनात वसंत फुलवेल. विशिष्ट व्यावसायिक विरोध मावळेल. उद्याचा सोमवार मोठ्या भाग्योदयाचा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ च्या वसंत पंचमीचा गुरुवार वलयांकित करणारा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून लाभ.

उमेद वाढेल - धनचिंता जाईल

कर्क : सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांची उमेद वाढवेल. उद्याचा सोमवार आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींची धनचिंता घालवणारा. वैवाहिक जीवनात आनंद साजरा कराल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट ध्येयसंपन्न करणारा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींचे सप्ताहात वास्तुविषयक व्यवहार. शारीरिक वेदना शमेल.

सरकारी कामांमध्ये यश

सिंह : मघा नक्षत्रास सप्ताहातील शनी-शुक्राचा सहयोग विशिष्ट सरकारी कामांतून यश देईल. उद्याचा सोमवार मोठा भाग्यसूचक. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींची शैक्षणिक चिंता जाईल. ता. २६ व २७ हे दिवस महत्त्वाच्या कामांतून अतिशय सुसंगत. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींची ता. २५ ची श्रीगणेश जयंती जीवनाचं सार्थक करणारी. गुप्त चिंता जाईल.

लाभदायी नोकरी मिळेल

कन्या : चित्रा नक्षत्रास सप्ताहारंभ महत्त्वाच्या कामांतून अतिशय सुसंगत. व्यावसायिक शुभारंभ. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना हा रथसप्तमीचा सप्ताह श्रीगणेश जन्मोत्सवासह विजयोत्सवाचाच. संधींचा लाभ उठवाच. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार थोरामोठ्यांच्या आशीर्वादातून लाभदायी. नोकरी मिळेल.

अपयश धुऊन काढाल

तूळ : सप्ताह शुक्र-शनी सहयोगातून विशिष्ट परिस्थितिजन्य लाभ देईल. सप्ताहात तरुणांवर संधींचा वर्षाव होईल. ता. २६ व २८ हे दिवस सर्व प्रकारांतून सुसंगत. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार विशिष्ट अपयश धुऊन काढेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नोकरीत मानांकन मिळेल.

सगळ्यांचं सहकार्य मिळेल

वृश्‍चिक : रथसप्तमीचा सप्ताह आपल्या राशीस विजयोत्सवाकडेच नेणारा, शिवाय ता. २६ ची वसंत पंचमी जीवनात वसंत फुलवणारी. उद्याचा सोमवार विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचं पूर्वसंचित फळाला आणेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात घरी आणि दारी माणसांचं सतत सहकार्य लाभेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींची सतत छाप पडेल.

नवकल्पनांना मूर्तरूप मिळेल

धनू : शुक्र-शनी सहयोगाचं एक उत्तम पॅकेज सप्ताहावर अंमल करेल. तरुणाईचा वसंत फुलेल. छान नव्या ओळखी होतील. विशिष्ट नवकल्पनांना मूर्त स्वरूप येईल. ता. २५ ते २७ हे दिवस चढत्या क्रमाने गतिमान आणि शुभ. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती परिस्थितिजन्य लाभ उठवतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट उपक्रमात दंग राहतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू भेटेल.

नोकरीतला विरोध मावळेल

मकर : सप्ताहारंभ शुभसूचक अशा घटनांचाच. नोकरीतील विरोध मावळेल. उद्याचा सोमवार उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक धनवर्षावाचा. नोकरीत बढतीची चाहूल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ ते २८ हे दिवस सर्व बाबतीत नैसर्गिक पाठबळ देणारे. धनिष्ठा नक्षत्रास वास्तुयोग.

नशिबाची साथ मिळेल

कुंभ : राशीतील शनी-शुक्र सहयोगाचं पॅकेज आपल्यावर उत्तम अंमल करेल. सप्ताहात नशिबाची साथ राहील. ता. २५ ते २७ हे दिवस देवतांच्या कृपेचेच. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचं संकटविमोचन. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना प्रिय व्यक्तींच्या सुवार्ता धन्य करतील. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुप्रचिती मिळेल.

विवाहाची संधी येईल

मीन : श्रीगणेशजन्माचा सप्ताह राशीच्या गुरूच्या सान्निध्यात ग्रहांच्या शुभ स्पंदनांचाच राहील. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ऐनवेळी रसद पुरवली जाईल. नोकरीत वरिष्ठांचा उत्तम प्रतिसाद राहील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींवरची विशिष्ट दुष्टछाया निघून जाईल. रेवती नक्षत्रास परिचयोत्तर विवाहाच्या उत्तम संधी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT