Belarus May Join Ukraine Russia War Google
युक्रेनवरील हल्ल्यानंतर (Ukraine Russia War) एकीकडे पाश्चिमात्य देश रशियावर टीका करत आहेत तर दुसरीकडे बेलारूसही रशियाला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. बेलारूसही रशियाला पाठिंबा देत युक्रेनवर हल्ला करण्यास तयार असल्याचं अमेरिकेच्या एका गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत वॉशिंगट पोस्टने वृत्त दिलं आहे.
बेलारुस हा रशियाचा जुना मित्रराष्ट्र आहे. आता बेलारुसने अण्वस्त्र तैनात करण्यासाठी आणि क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी रशियाला आपली भूमी दिल्याची माहिती आहे. वॉशिंगट पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, बेलारुस त्यांचं सैन्य युक्रेनमध्ये पाठवणार असल्याची माहिती आहे. युक्रेनची जवळपास निम्मी सीमा बेलारूसला लागून आहे. अशा परिस्थितीत युक्रेनच्या सीमेवर रशियाने बेलारूसमध्येही आपले सैन्य तैनात केले आहे. त्याचवेळी बेलारूसमध्येच रशियाने युक्रेनला चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. बेलारुसमध्ये दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. युक्रेन आणि रशियामध्ये झालेल्या चर्चेनंतर पुढे काय करायचं? हे ठरवलं जाईल. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू राहिल्यास बेलारुस रशियाच्या मदतीसाठी मैदानात उतरेल, असे बेलारुसच्या अध्यक्षांनी सांगितल्याचं वृत्त असोसिएटेड प्रेसने दिलं आहे. युक्रेनने चर्चा करण्याची संधी गमावली असून आपल्या आण्विक दलाला सतर्क राहण्याच्या सूचना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिले आहे. तसेच यापूर्वी नाटोमधील देशांनी आमच्याकडे देखील अण्वस्त्र असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता अणुयुद्धाची भीती व्यक्त केली जात आहे. बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेन्को यांनी युक्रेनमध्ये फौजा पाठवणार नसल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दिमिर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.