फोटोग्राफी

PHOTO - बेळगाव बंद; व्यापाऱ्यांवर कर्नाटक पोलिसांकडून दडपशाही

काही ठिकाणी पोलिसांकडून दुकाने उघडण्यासाठी व्यापाऱ्यांवर दडपशाही केली जात आहे.

मिलिंद देसाई

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या हाकेला प्रतिसाद देत शहर आणि परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली आहेत. काही ठिकाणी पोलिसांकडून दुकाने उघडण्यासाठी व्यापाऱ्यांवर दडपशाही केली जात असल्याचे पहावयास मिळत आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या हाकेला प्रतिसाद देत शहर आणि परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली आहेत.
काही ठिकाणी पोलीसांकडून दुकाने उघडण्यासाठी व्यापाऱ्यांवर दडपशाही केली जात असल्याचे पहावयास मिळत आहे.
बंदला मिळालेला प्रतिसाद पाहून प्रशासन बिथरल्याचे पहावयास मिळत असून अनेक गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
दुसरीकडे विविध मंडळांनी फलकांवर बेळगाव बंद लिहिलेला मजुकर पुसण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे.
समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर करण्यात आलेल्या शाईफेकीचा निषेध करत बेळगावकरांनी बंदला चांगला प्रतिसाद दिला आहे.
बंदमुळे अनेक कामगारांनी घरी राहणे पसंत केल्याने औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने बंद ठेवण्यात आली आहेत.
शहापुर, टिळकवाडी, अनगोळ, शहराचा मध्यवर्ती भाग आणि ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून सकाळच्या सत्रात शहरातील काही रस्त्यांवर वाहनांची वर्दळ पाहावयास मिळत होती.
बंदला पाठिंबा मिळत असल्याचे पाहून अनेकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद करून घरी राहणे पसंत केले आहे.
अनेक रस्त्यांवरील वर्दळ पुर्णपणे थंडावली असून गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत बंदला प्रतिसाद मिळाल्याचे मत मराठी भाषिकांतून व्यक्त होऊ लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT