भारतात अनेक रेस्टॉरंट मालकांनी काही विचित्र नावांनी आपले कॅफे उघडले आहेत, ज्याचे नाव ऐकून एकतर तुम्ही गोंधळून जाल किंवा तुम्हाला हसू फुटेल. होय, ही नावे अशी आहेत की जर तुम्ही त्यांच्यासोबत इन्स्टा वर फोटो टाकलात तर लोक तुम्हाला पत्ता विचारू लागतील.
या अल्लाह चला दे होटल - हे एक कबाब सेंटर आहे जे त्याच्या नावामुळे दिल्लीत खूप प्रसिद्ध आहे. हे रेस्टॉरंट अल्लाहला त्याची जागा चालवण्याची विनंती करत आहे. जामा मशिदीजवळ असलेल्या कबाबच्या दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळते.आओ कभी हवेली पे - अभिनेते अमरीश पुरी यांच्या 'आओ कभी हवेली पे' या प्रसिद्ध सिनेसंवादावरून महाराष्ट्रातील या हॉटेलला नाव देण्यात आले आहे. खराब चाय - चहा आवडला नाही की, लोक त्याला 'खराब चहा' म्हणतात. त्यामुळे लोकांनी आपल्या चहाला नावं ठेवण्याआधीच हॉटेलच्या मालकाला आपल्या हॉटेलला नाव ठेवलं आहे. पॉटी रेस्तराँ - पोटी हा मल्याळम शब्द आहे जो केरळमधील विशिष्ट वर्गातील लोकांसाठी आडनाव म्हणून वापरला जातो. रेस्टॉरंटचे नाव पॉटी आडनाव असलेल्या व्यक्तीच्या नावावर आहे. तथापि, potty चा इंग्रजी अर्थ काय आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. पॉटी या नावामुळे हे ठिकाण सर्वाधिक प्रसिद्ध आहे.व्हजायना तंदुरी - हे नाव का ठेवण्यात आलं याचं कारण अज्ञात आहे. मात्र हे नाव लोकांचं लक्ष नक्कीच वेधून घेतं. दुसरी बिवी - हे रेस्टॉरंट घरच्यासारखे जेवण पुरवते, असे मालकाचे म्हणणे असल्यामुळे त्यांनी रेस्टॉरंटचे नाव दुसरी बिवी असे ठेवले आहे. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.