Hardeek Joshi And Akshaya Deodhar wedding Photo Instagram
अक्षया देवधरच्या मेहेंदीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. अक्षयानं निळसर रंगाचा टॉप आणि कलरफुल घेरदार स्कर्ट असा पेहराव मेहेंदी सोहळ्याला केला होता. हार्दिकच्या घरातही पारंपरिक पद्धथतीनं पार पडलेल्या हळदी समारंभाचे फोटो समोर आले आहेत. अक्षयानं मेहेंदी सोहळ्याच्या निमित्तानं केलेल्या फोटोशूट मध्ये तिच्या चेहऱ्य़ावर नवराईचं तेज पहायला मिळत आहे. हार्दिक आणि अक्षयाचा लग्नासोहळा पार पडलाय आणि आता २ डिसेंबरला मुंबईत रीसेप्शन सोहळा पार पडणार आहे. हार्दिकच्या हळदी समारंभाला त्याचे इंडस्ट्रीतील सहकलाकार अन् मित्रांनी हजेरी लावली होती. हार्दिक आणि अक्षयाचं लग्न हे पुण्यात पारंपरिक पद्धतीनं पार पडलं. 'तुझ्यात जीव रंगला...' मालिकेच्या सेटवर जुळलेलं प्रेम ,मग काही वर्ष रीलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर हार्दिक आणि अक्षयानं लग्नाचा निर्णय घेतला. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.