Akshay Kumar House esakal
फोटोग्राफी

Akshay Kumar House : सर्वाधिक टॅक्स भरणारा खिलाडी राहतो कुठे? त्याचं आलिशान घर बघितलंत का?

आज आम्ही तुम्हाला अक्षयचं राहातं घर आणि त्याचं आतील इंटेरीयर दाखवणार आहोत

सकाळ ऑनलाईन टीम

Akshay Kumar House : बॉलीवूडला एकापेक्षा एक भारी आणि ब्लॉकबास्टर चित्रपट देणाऱ्या अक्षयला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ओळखतात. सगळ्यात जास्त टॅक्स भरणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत त्याचे नाव अग्रस्थानी आहे. सर्वाधिक टॅक्स भरणारा खिलाडी कोठे राहतो त्याचे घर कसे आहे तुम्हाला माहितीये का? आज आम्ही तुम्हाला अक्षयचं राहातं घर आणि त्याचं आतील इंटेरीयर दाखवणार आहोत.

अक्षय मुंबईत त्याच्या आलिशान घरात कुटुंबासोबत राहतो. अक्षय कुमारचे जुहू येथील घर, त्याची पत्नी व अभिनेत्री आणि इंटिरिअर डिझायनर ट्विंकल खन्ना हिने डिझाइन केलेले आहे. सुशोभित इंटीरियरसह विशाल समुद्र त्यांच्या घरापुढे आहे.
अक्षय कुमारचं घर हे एक भव्य निवासस्थान आहे ज्यामध्ये एक मोठे लॉन आहे जे समुद्राच्या दिशेकडे आहे. या घरात अक्षय आणि ट्विंकलची प्रतिमासुद्धा आहे. अक्षय कुमारच्या घराची अंदाजे किंमत 80 कोटी आहे. त्याच्या घराचं फर्निचर अत्यंत उत्कृष्ट आहे आणि त्याच्या घराच्या बाहेर बुद्धांची भव्य मूर्तीदेखील आहे.
अक्षय कुमारने मुंबईतील खारमध्ये ७.८ कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी केले होते. 1,878 चौरस फुटांमध्ये पसरलेले हे अपार्टमेंट खार (पश्चिम) येथील जॉय लिजेंड इमारतीच्या 19व्या मजल्यावर आहे. या घरात चार कार पार्किंग आहेत. 7 जानेवारी, 2022 रोजी हे घर त्याच्या नावे नोंदणीकृत होते. अक्षय कुमारचे मुंबईतील हे नवीन घर आहे, या घराचा परिसर शहरातील उत्कृष्ट परिसरांपैकी एक आहे.
अक्षय कुमारला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायला आवडते. गोव्यात हॉलीडे व्हिला तर कॅनडात त्याचे अपार्टमेंट आहे. मॉरिशसमधील आकर्षक घरांपैकी एक घर त्याचे आहे. तर मुंबईतही त्याचे अनेक अपार्टमेंट्स आहेत.
अक्षय त्याच्या जुहू येथील घरी राहातो. त्याचे हे घर चर्चेत असते. अक्षयने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महागड्या रिअल इस्टेटमधे गुंतवणुक केली आहे. या रियल इस्टेटची गनणा जगातील सगळ्यात महागड्या इस्टेट्समधे केली गेली आहे.
अक्षयच्या घराचे इंटेरीयर भारी असून अनेक कोरीव पेंटींग्जने त्याचे घर सजलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: पानिपत'कारांच्या गळ्यात मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची माळ?

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT