Lalit Modi Sushmita Dating sakal
Lalit Modi Sushmita Dating : इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ललित मोदींनी बुधवारी केलेल्या ट्विटने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ललित मोदींनी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचे काही फोटो ट्विट करून दोघे एकमेकांना डेट करत असल्याची घोषणा केली.
आयपीएलचे संस्थापक ललित मोदी नेहमीच चर्चेत असतात, मग राजस्थान क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांचा प्रवेश असो किंवा आयपीएलची स्वतःची निर्मिती असो.आयपीएलच्या वादानंतर त्याने भारत सोडला होता, अनेक एजन्सी त्याच्या मागे लागल्या आसुन, पण तो काही भारतात परतलाच नाही.2007 साली जेव्हा टी-20 विश्वचषकामुळे भारतात क्रिकेटची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. त्याचवेळी ललित मोदी इंडियन प्रीमियर लीग सुरू करण्याच्या तयारीत व्यस्त होते. ललित मोदींनी एकट्याने ही कल्पना बीसीसीआयसमोर ठेवली आणि एकहाती लाँचही केली.2007 मध्ये आयपीएलची घोषणा होण्यापूर्वी बीसीसीआयमध्ये ललित मोदी विरोधी गटाचे असे अनेक सदस्य होते ज्यांना हा प्रकल्प अयशस्वी व्हावा असे वाटत होते ललित मोदींच्या नेतृत्वाखाली 2008 आणि 2009 ची आयपीएल अतिशय उत्कृष्ट आणि सुपरहिट ठरली. पण आयपीएल 2010 नंतर परिस्थिती बदलली, कारण त्यावेळी दोन नवीन संघ आयपीएलमध्ये दाखल झाले होते. आयपीएलमध्ये कोची आणि पुण्याचे संघ आणण्यात आले होते, त्यात कोचीचा संघ ज्या पद्धतीने विकत घेण्यात आला आणि अनियमितता आढळून आली, त्यावरून बराच वाद झाला होता.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.