दिबांच्या नावासाठी भूमिपुत्रांचे काम बंद आंदोलन Sakal media
फोटोग्राफी

दिबांच्या नावासाठी भूमिपुत्रांचे काम बंद आंदोलन; घोषणाबाजीने दुमदुमला परिसर

नरेश शेंडे
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आणि विमानतळाला नाव देण्याबाबत सरकारने एका महिन्यात निर्णय न घेल्यास एक लाख आंदोलक रस्त्यावर उतरतील आणि आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी कृती समितीने दिला. महिलांची उपस्थिती लक्षणीय आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आता पुरे झाले. दिबांशिवाय कोण उरले, विमानतळाला दुसरे नाव शक्‍यच नाही, अशा स्‍वरूपातील घोषणा यावेळी देण्यात आल्‍या.
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या विमानतळ काम बंद आंदोलनात हजारोंच्या संख्येने प्रकल्‍पग्रस्‍त सहभागी झाले होते.
आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या प्रकल्पग्रस्‍तांच्या नेत्यांनी केलेल्या लांबलचक भाषणांमुळे काही आंदोलक नाराज झाले होते. भाषणबाजी कमी करा आणि ठोस भूमिका घ्या, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समिती व इतर संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कृती समितीचे उपाध्यक्ष रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी ११९ पोलिस अधिकारी, ९०७ अंमलदार, एक एसआरपी बिट विमानतळ परिसरात तैनात करण्यात आले होते. आंदोलनात पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातील जवळपास अडीच हजारांहून अधिक आंदोलक सामील झाल्याचा अंदाज पोलिस विभागाच्या गोपनीय कक्षाकडून वर्तवण्यात आला.
सकाळी सुरू झालेल्या आंदोलनप्रसंगी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता; तर आंदोलकांच्या भीतीने सिडकोने रविवारपासूनच विमानतळाचे सुरू असलेले काम बंद ठेवले होते. (सर्व छायाचित्रे - सत्यवान वास्कर )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT