sonali kulkarni instagram sakal
सोनाली कुलकर्णी(Sonalee KUlkarni) नेहमीच स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. मीरा कलेक्शनच्या खणांपासून बनवलेल्या मॉर्डन पेहरावाचं यानिमित्तानं सोनालीनं प्रमोशन केलं आहे. याआधी खणाची(Khan) पारंपरिक साडी मॉर्डन पद्धतीनं कशी नेसली जाऊ शकते यासंदर्भातलेही काही फोटो सोनालीनं शेअर केले होते. आताच्या या फोटोत खणाला चक्क पॅंट आणि क्रॉप टॉपचा लूक देऊन एकदम झक्कास अंदाजात मीरा कलेक्शननं समोर आणलं आहे. सोनालीलाही खणाचा हा लूक भलताच आवडला आहे. खण म्हणजे फक्त ट्रेडिशनल साडी,भरपूर दागिने हा विचार मीरा कलेक्शनला मोडीत काढायचा आहे. खणाला मॉडर्न लूक देऊन अगदी एकही दागिना न घालता अधिक ग्लॅमरस अंदाजात सादर केलं जाऊ शकतं याचे हे सोनालीचे फोटो उत्तम उदाहरण आहेत. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.